इगतपुरी (जि. नाशिक) : नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) रविवारी (ता. २९) दुपारी कंटेनर (एमएच-०४-जेके०३१५) घाट उतरत असताना चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर लतिफवाडीच्या वळणावर उलटा झाला. यात चालक कंटेनरमध्येच अडकल्याने त्याला बाहेर काढणे अवघड झाले होते. चालकाला बाहेर काढण्यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिसांनी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमला ( Disaster Management Team) कळवून मदतीचे आवाहन केले. श्याम धुमाळ व त्यांच्या टीमने कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकास एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. मात्र या अपघातात चालकाचा (Driver) एक पाय कायमचा निकामी झाला. (Container accident at new Kasara Ghat Nashik News)
कसारा घाटातील लतिफवाडीजवळ घाट उतरत असताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट महामार्गावर उलटला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, उपनिरीक्षक हरी राऊत व पोलिस पथकाने अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अडचणी येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन टीमला बोलावण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, स्वप्नील कलंत्री, अक्षय लाडके, विनोद आयरे, बाळू मांगे, सनी चिले, प्रसाद दोरे यांनी महामार्ग पोलिसांच्या मदतीने चालक रवींद्र सिंग (रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) याला सुखरुप बाहेर काढले. मात्र यात चालकाचा एक पाय निकामी झाला असून क्लीनर अमित कुमार जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग सुरक्षा पोलिसांनी उलटलेला कंटेनर त्वरित बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.