Nashik : कसारा घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालकाला वाचवण्यात आपत्ती टीमला यश

The container fell into a 50 feet gap in the ghat and the front part was damaged.
The container fell into a 50 feet gap in the ghat and the front part was damaged.esakal
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंटजवळ शनिवारी (ता.२९) सकाळच्या सुमारास सिमेंटच्या पेवरब्लॉकने भरलेला कंटेनर (MH 48 HF 1513) चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षक भिंत तोडून थेट ५० फूट दरीत जाऊन कोसळला. या अपघातात कंटेनरचालक कंटेनरखाली अडकला होता. त्याला वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश आले. (Container falls into valley at Kasara Ghat disaster team managed to save driver Nashik Latest Marathi News)

The container fell into a 50 feet gap in the ghat and the front part was damaged.
Chain Snatching Crime : वृद्ध महिलेची 4 तोळ्याची पोत ओरबाडली

या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, स्वप्नील कलंत्री, विनोद आयरे, अक्षय राठोड, बाळू मांगे, जस्स्सी भाई यांना घटनास्थळी महामार्ग पोलिसांच्या मदतीने या टीमने मदत कार्य सुरु केले. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्याचे एक प्रकारे आवाहन होते.

नियोजन करून क्रेनचे बेल्ट ट्रकच्या काही पार्टला लावून थोड्या प्रमाणात वर घेतले. दोन सदस्य व एक टेम्पो चालक केबिनमधे दाखल होऊन जखमी चालकास बाहेर काढण्याचे काम सुरु केले. एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गभीररित्या अडकलेल्या जखमी चालकास सुखरूप बाहेर काढण्यात या टीमला यश आले.

कसारा आणि रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकाला क्रेंनच्या सहाय्याने बाहेर काढून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या चालकाला बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी मनुष्यबळ कमी असताना देखील अनेक नागरिक मदत करण्याऐवजी मोबाईलवर शूटिंग करण्यात मग्न होते अशी खंत आपत्ती व्यवस्थापन टीमच्या शाम धुमाळ यांनी व्यक्त केली.

The container fell into a 50 feet gap in the ghat and the front part was damaged.
NashiK : धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.