Strike News: संपामुळे कंत्राटींच्या भरवशावर Civilची रुग्णसेवा; नातलगांनीच केली रूग्णांची ने-आण

Strike News
Strike Newsesakal
Updated on

नाशिक : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रलंबित मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात आरोग्य विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीही सामील झालेले आहे.

संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे दिसून आले. रुग्णांची ने-आण नातलगांनाच करावी लागल्याने त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर, ओपीडी व औषध वितरणावरही या संपामुळे परिणाम झाल्याचे दिसून आले.

Strike News
Employees Strike : संपकरी कर्मचाऱ्यांचा आक्रोश, तुडूंब भरले ईदगाह मैदान; पहा Photos

संपात जिल्हा रुग्णालयातील १ हजार ११३ कर्मचारी तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णालयांमधील १ हजार ३७५ कर्मचारी सहभागी आहेत. आरोग्य विभागातील रूग्णसेवा व इतर प्रशासकीय कामे खोळंबल्याचे संपाच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले. परिचारिका व वर्ग ३ आणि चारमधील कर्मचारी या संपात सहभागी आहेत.

रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी ३०० कंत्राटी कर्मचारी व ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सेवा बजावत रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. सिव्हिलमधील आंतररूग्णांवर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने उपचार करण्यात आले. बाह्यरुग्ण विभागात आलेल्या शेकडो रुग्णांना संपाचा सर्वाधिक फटका बसला.

Strike News
Employee Strike : संपात फूट; कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संघटनेची माघार, आजपासून कामावर रुजू

नियमित कर्मचारी नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना केसपेपर व गोळ्या औषधे देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांना या कामांचा अनुभव नसल्याने दोन्ही ठिकाणी रुग्णांची व नातलगांच्या लांब रांगा पहावयास मिळाल्या. ग्रामीण भागातही रुग्णांना उपचारासाठी काही वेळ ताटकळत बसावे लागल्याचे चित्र होते.

संपात वर्ग तीन व चारसह सफाई कर्मचारी सहभागी असल्याने जिल्हा रुग्णालयासह अन्य ग्रामीण रुग्णालयांत स्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. नातलगांनाच आपल्या रुग्णाला स्ट्रेचरवरून वार्डात ने-आण करावी लागते आहे.

Strike News
Nashik News : कारवाईचा बडगा उगारताच कर भरणासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीत रांगा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

संपाच्या तिसऱ्या दिवशी (ता.१६) सर्व सरकारी कर्मचारी, परिचारिका, लिपिक व त्यांच्या संघटनांतर्फे सकाळी गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष धनवीर चंडालिया, अख्तर शेख, किसन डुलगज, प्रशांत बागुल, दिलीप बोढरे, मिलिंद पवार, प्रकाश गुळवे आदींसह कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.

Strike News
Nashik News : समृद्धीमार्गे धावणाऱ्या शिर्डी- नागपूर बस सेवेला ब्रेक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.