Nashik News: कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे ‘कायम करा’साठी बेमुदत कामबंद आंदोलन; सिव्हिलमधील सेवेवर परिणाम

Agitation
Agitationesakal
Updated on

नाशिक : राष्ट्री आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कंत्राटी पदावर नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांनी आजपासून (ता.२८) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

रिक्त झालेल्या पदावर कंत्राटी कर्मचार्यांचे समायोजन व एनएचएम कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सदरील आंदोलन पुकारण्यात आले आहे.

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेवर काहीप्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र, आंदोलन लांबल्यास रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केला आहे. (Contractual health workers strike indefinite strike to make permanent Effect on service in civil hospital Nashik News)

राष्ट्रीय आराेग्य अभिनाय कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.

नाशिक जिल्हा आरोग्य विभागांतर्गंत जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्र, महापालिका आरोग्य विभागातील एनएचएम अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, तंत्रज्ञ आदींसह सुमारे तीनशे कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

तर, तालुकापातळीवरही आंदोलन सुरू आहे. यातील बहुतांशी कर्मचारी हे २००६ पासून एनएचएमअंतर्गंत रुग्णसेवेत आहेत. ‘एकच नारा... कायम करा, न्याय मागतो.. भीक नाही, समान काम... समान वेतन अशा स्वरुपाच्या घोेषणांनी परिसर दणाणला होता.

कृती समितीतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आले. १९७१चाच आरोग्य विभागातील आकृतीबंदानुसार कर्मचारी भरती केली जाते. तर २००६ पासून कंत्राटी कर्मचारी असून, त्यांचे समायोजन करण्यात आलेले नाही.

५ टक्के वेतनवाढ केली जाते जी पुरेशी नाही. रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचार्यांचे समायोजन करावे आदी मागण्यांबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु तोंडी आश्वासन देण्यात येते.

परंतु यावेळी कृती समितीने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, त्यात एनएचएमचे कंत्राटी कर्मचार्यांच्या सहभागामुळे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

आंदोलनात मुख्य समन्वयक मीनाक्षी मोरे, नूतन शिंदे, वैशाली ढोणे, सुनिता पवार, डॉ. पंकज पगार, डॉ. माधुरी गिरी, डॉ. रोहिनी जाधव, उद्धव हांडोरे, कैलास हांडोरे, विलास खैरनार, हेमंत परदेशी आदींसह अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Agitation
Nashik News: पाणीपट्टी दरवाढीला स्थगिती, रद्द नव्हे; पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार नाशिककरांवर कायम

आज फेरी

दरम्यान, उद्या (ता.२९) आंदोलनाच्या दुसर्या दिवशी सकाळी एनएचएम कर्मचार्यांची फेरी काढण्यात येणार आहे.

फेरीला गोल्फ क्लबपासून प्रारंभ होऊन झेडपीरोड, शालिमार, नेहरु गार्डन, एम.जी. रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस, त्र्यंबकनाका, जिल्हा रुग्णालय असा फेरीचा मार्ग असेल.

सेवेत पण काळ्या फिती लावून

एनएचएम अधिकारी-कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे सिव्हिलमधील रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.

असे असले तरी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अत्यावश्यक सेवेत नियुक्त असलेल्या एनएचएम कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवले. परंतु या प्रत्यक्ष कामावर असतानाही कर्मचार्यांनी हजेरी लावून घेतलेली नाही.

पर्यायी व्यवस्था सज्ज

आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला. मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून मेडिकल कॉलेजचे अधिकारी-कर्मचारी आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या नर्सेसची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आंदोलन दोन दिवसांनी आणखी तीव्र होण्याची शक्यता पाहून पर्यायी व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

"आंदोलनामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आंदोलन लांबल्यास नर्सिंग महाविद्यालयाच्या नर्सेस रुग्णसेवेसाठी सज्ज असतील."

- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक.

Agitation
NMC News: कायमस्वरूपीच्या नावाखाली मानधनावरील डॉक्टरांकडून वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.