Water Scheme : लासलगावसह 16 गावांच्या पाणीयोजनेसाठी नियंत्रण समिती

Water
Water esakal
Updated on

Water Scheme : लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती नेमण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या समितीच्या माध्यमातून १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. (Control committee for water scheme of 16 villages including Lasalgaon nashik news)

लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतील गळतीमुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी होत्या. यातच लासलगाव बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रियेदरम्यान योजनेतील त्रुटी तसेच सोळा गाव समितीच्या कामकाजा विरोधात प्रकाश पाटील यांनी उपोषण केले होते.

उपोषण सुरू असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी श्रीमती मित्तल यांची भेट घेत लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्याअनुषगांने बैठक बोलाविली होती.

सोमवारी (ता.१५) मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, १६ गाव पाणीपुरवठा योजनेवर प्रशासकीय मार्गदर्शन गटविकास अधिकाऱ्यांचे तर तांत्रिक मार्गदर्शन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांचे असल्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water
350th Shivrajyabhishek Din : रायगडावर 6 जूनला 351 ध्वजाची सलामी! नाशिकच्या सिंहगर्जना मंडळाचा उपक्रम

बैठकिला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह सोळा गाव पाणीपुवरवठा योजनेचे सदस्य उपस्थित होते. मित्तल यांनी समिती सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत नियंत्रण समितीचा मार्ग काढला. जिल्हयातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर १६ गाव पाणीपुरवठा योजनेची समिती तयार करण्यात आली आहे. यापूर्वी असलेली वर्किंग समिती आहे तीच राहणार असून फक्त नियंत्रण समितीची भर घालण्यात आली. वर्किंग कमिटीमध्ये १६ गावांच्या सरपंचांचा समावेश आहे. त्यांपैकी रोटेशनपद्धतीने अध्यक्षपद ठेवण्यात येईल. १६ गावांचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक हे या समितीचे सहसचिव असतील. तर ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहे.

Water
Bottled Water Inspection : अन्न व औषध प्रशासनातर्फे बाटलीबंद पाण्याची तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.