Nashik ZP News : वादग्रस्त कार्यकारी अभियंता कंकरेज यांची अखेर बदली

नगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची नियुक्ती
Transfer
Transferesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे वादग्रस्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी नगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची बदली झाली आहे. (Controversial Executive Engineer Kankerej finally transferred Nashik ZP News)

जि. प. बांधकाम कार्यकारी अभियंता कंकरेज यांच्यामुळे कामे रद्द झाल्याचा आरोप करत आमदार हिरामण खोसकर व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली होती.

यातच आमदार सुहास कांदे यांनी कंकरेज यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीतही कंकरेज यांचा मुद्दा उपस्थित झाला होता.

त्या वेळी पालकमंत्री भुसेंनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत कंकरेज यांच्या कामकाजाचे नव्याने चौकशीचे आदेश दिले होते. यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारींवर कंकरेज यांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू होती.

यामुळे कंकरेज यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारींवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. कंकरेज यांनी पुन्हा रुजू होण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कंकरेज यांचा कामकाजाचा अहवाल प्रशासनाने मंत्रालयात पाठविला.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Transfer
Nashik News : रस्ते खोदाई विरोधात उपोषण

रुजू करून घेत नसल्याने कंकरेज यांनीही बदलीसाठी अर्ज केला होता. अखेर, बांधकाम विभागाने कंकरेज यांची बदली नगर परिषद संचालनालय नाशिक येथील रिक्तपदी झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगर जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे अभियंता सोनवणे यांची बदली झाली आहे. श्री. सोनवणे लवकरच पदभार घेणार आहेत.

नारखेडे यांच्या जागी मेतकर

बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांची पदोन्नती असून, त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी दोन महिन्यांपूर्वी संजय शेवाळे यांची बदली झाली होती.

मात्र, नारखेडे यांची पदोन्नती होत असलेली जागा रिक्त न झाल्याने शेवाळे यांना जिल्हा परिषदेत येऊन पदभार न घेता माघारी फिरावे लागले होते. आता नारखेडे यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या जागी पुन्हा नगर परिषद प्रशासन संचालनालय येथील कार्यकारी अभियंता पंकजकुमार मेतकर यांची बदली झाली आहे.

Transfer
Nashik Crime News : बिअर दिली नाही म्हणून बारमालकास मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.