Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

MLA Devyani Farande and Municipal Commisioner Chandrakant Pulkundwar
MLA Devyani Farande and Municipal Commisioner Chandrakant Pulkundwar esakal
Updated on

नाशिक : मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या विनयनगर येथील वादग्रस्त भूखंडावर होत असलेले पक्की बांधकामे आठ दिवसात हटविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना दिल्याचा दावा केला जात आहे.

मध्य विधानसभा मतदारसंघातील विनयनगर व भारतनगरच्या मध्यभागी असलेल्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिक व अधिकाऱ्यांनी संगनमत करून दलित सैनिकाची जमीन बेकायदेशीर विकण्याचा घाट घातला असून, कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. यासंदर्भात यापूर्वी आयुक्तांकडे तक्रार करून दखल घेतली नाही. (Controversial of Vijayanagara Encroachment on the plot will be removed Commissioner assurance to Devyani Farande Nashik News)

MLA Devyani Farande and Municipal Commisioner Chandrakant Pulkundwar
Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी

त्यामुळे आमदार फरांदे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा यांनी भेट घेतली. वारंवार तक्रार करूनदेखील कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

सैन्यात काम केल्याचा मोबदला म्हणून दिलेल्या जमिनीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विक्री होत आहे. या प्रक्रियेत शासनाच्या करोडो रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झालेले असताना महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

MLA Devyani Farande and Municipal Commisioner Chandrakant Pulkundwar
Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

गोरगरीब व सामान्यांच्या पत्र्याच्या शेडवर कारवाई करण्यासाठी तत्पर असणारा नगररचना विभाग शांत का, असा सवाल त्यांनी केला. तत्काळ कारवाई न झाल्यास भूमिका तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर आठ दिवसात कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

निवडणुकीत गाजणार मुद्दा

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमणाचा मुद्दा गाजणार आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिक संघटना व विविध मंदिरांच्या विश्वस्तांकडून वांरवार निवेदन दिले जात आहे. गेल्या दीड वर्षापासून निवेदन दिले जात असताना कारवाई होत नसल्याने निवडणुकीच्या अनुषंगानेदेखील या मुद्द्याकडे पाहिले जात आहे.

MLA Devyani Farande and Municipal Commisioner Chandrakant Pulkundwar
Nashik News : ...जेव्हा स्वामिनारायण मंदिरात शिरतात अतिरेकी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.