NMC News : स्मार्टसिटी कंपनीकडून बारा बंगला व पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु कामे सुरू होण्याच्या सुरवातीलाच वादात सापडली आहे.
बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात जवळपास १५ ते २० झाडे तोडली गेल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात असून एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याची आवश्यकता नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान महापालिकेने वृक्षतोडीला परवानगी देताना हरकती व सूचना का मागविल्या नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Controversy after works start Tree felling in Bara Bangla Water Purification Project premises NMC Nashik News)
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. सदरची कामे कासवगतीने सुरू असल्याने स्मार्टसिटी कंपनीला आधीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे.
त्यात आता पुढील वर्षाच्या जून महिन्यांपर्यंत स्मार्टसिटी कंपनीला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने नागरिकांना आणखीन एक वर्ष मनस्ताप सहन करावा लागेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
स्मार्टसिटी कंपनीकडून आता दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यात गावठाण पुनर्वास योजनेअंतर्गत सध्या कामे सुरू आहे. सदर कामे विलंबाने तर होत आहे, त्याशिवाय गावठाण भागातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
आता पंचवटी व जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम १७५ कोटी रुपयांचे असून १३ महिन्यांपूर्वी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. अद्यापपर्यंत कामांनी हवी तशी गती पकडलेली नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र त्यापूर्वीच सदरची कामे वादात सापडली आहे. हिरवाईने नटलेल्या बारा बंगला परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. यातील पंधरा ते वीस वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण समितीने परवानगी दिली आहे.
सदर परवानगी देताना हरकती व सूचनांना मागविल्याने काम वादात सापडले आहे. सर्वसामान्यांना एक झाड तोडण्यासाठी अनेक कागदपत्रांचा सोपस्कार पार पाडावा लागतो. मात्र जलशुद्धीकरण केंद्राचे काम करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण समितीने दिलेली परवानगी वादात सापडली आहे.
संबंधित ठेकेदाराने आवश्यक असेल त्यानुसार वृक्षतोड करणे आवश्यक होते, मात्र एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.