नाशिकमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून प्रशासनात कलगीतुरा

corona deaths
corona deaths esakal
Updated on

नाशिक : पावसाळी अधिवेशनात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला कोरोनाबळींच्या संख्येवरून घेरण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा रुग्णालयाकडून मागविलेल्या मृतांची आकडेवारी अचानक वाढली. यामुळे शासनाने जिल्हा रुग्णालयाला विचारणा केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने महापालिकेवर जबाबदारी ढकलत नोटीस पाठविल्याने महापालिकेनेही १८८ रुग्णालयांना पाठविलेल्या नोटिसांची जंत्रीच जिल्हा रुग्णालयाला सादर केल्याने मृतांच्या आकडेवारीवरून प्रशासनात कलगीतुरा रंगला आहे. controversy has started in the administration over the number of corona death nashik

शहरात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालय, महापालिका या शासकीय संस्थांमध्ये वादाची लाट निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. या लाटेत रुग्णवाढीचा जोर सहा ते सातपटींनी वाढलेला दिसून आला. एप्रिलमध्ये एक लाखाच्या वर रुग्णसंख्या पोचल्याने महापालिकेने पोर्टलवर रुग्ण व मृतांची आकडेवारी अपलोड करण्याची सूचना शहरातील खासगी रुग्णालयांना केली. परंतु, कोरोनारुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात होती, की रुग्णालय प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसल्याचे कारण देण्यात आले. मेअखेरपासून कोरोना संसर्गाचा जोर ओसरल्याने आता शासनाच्या आयसीएमआर पोर्टलवर माहिती लोड करण्यास सुरवात झाली आहे. आठ दिवसांत शहरात एक हजाराहून अधिक बळी गेल्याचे आयसीएमआर पोर्टलवर दिसून आले. वास्तविक मृत्यूचा आकडा मार्च व एप्रिलमधील आहे. मृतांचा आकडा राज्य शासनाला प्राप्त झाल्याने मृतांच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याने शासनाने जिल्हा रुग्णालयाकडे विचारणा केली. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाने महापालिकेला नोटीस पाठवत येणाऱ्या संकटाची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर टाकली. मात्र, महापालिकेनेही तातडीने ज्या खासगी रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या. त्याची जंत्रीच जिल्हा रुग्णालयाला सादर केली. महापालिकेने मृत्यूंच्या नोंदणीबाबत केलेले काम चोख असून, यासंदर्भातील माहितीचा तपशील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर केला.

corona deaths
नाशिकमध्ये मॉल सुरु करण्यास परवानगी; दुपारी चारपर्यंत राहणार सुरु



आठ दिवसांत एक हजार मृत्यू

गेल्या वर्षाच्या मार्चपासून शहरात कोरोना संसर्ग वाढू लागला. आतापर्यंत तीन हजार २२५ कोरोना मृत्यूची नोंद झाली. मार्च व एप्रिलमध्ये फक्त दोन हजार २०० मृत्यूची नोंद पोर्टलवर होती. आता खासगी रुग्णालयांकडून पोर्टलवर माहिती अपडेट केली जात असल्याने आठ दिवसांत एक हजार २३ मृत्यू वाढले. प्रत्यक्षात हे मृत्यू मार्च व एप्रिलमधील आहेत. महापालिकेने १८८ रुग्णालयांना नोटिसा पाठवून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

corona deaths
नाशिक महापालिकेचे १४ महिन्यांत तेराशे कर्मचारी कोरोनाबाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.