Nashik Sahakar Parishad : नाशिकला डिसेंबरमध्ये होणार सहकार परिषद; बोधचिन्हाचे अनावरण

Dignitaries unveiling the insignia of the cooperation conference to be held in Nashik in December
Dignitaries unveiling the insignia of the cooperation conference to be held in Nashik in December esakal
Updated on

Nashik Sahakar Parishad : आधुनिक युगात सहकार सर्वत्र नेण्यासाठी आणि प्रबोधनात्मक जाणीव गतिमान करण्यासाठी नाशिकला डिसेंबर २०२३ मध्ये होणारी सहकार परिषद आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून सर्वांसमोर येईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा सहकार परिषदेच्या स्वागताध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी केले. (Cooperation Conference to be held in Nashik in December news)

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे होणाऱ्या सहकार परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या वेळी त्या म्हणाल्या, की सहकार क्षेत्रातील अनेक प्रश्नांची, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून व परिषदेच्या माध्यमातून निश्चित दिशा मिळू शकेल. केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय त्यासाठी मदत करेल.

बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष व सहकार परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर म्हणाले, की परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे नागरी सहकारी बँकांच्या संबंधातील असलेले प्रश्न, समस्या व अडचणींचे निराकरण व्हावे, हा उद्देश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dignitaries unveiling the insignia of the cooperation conference to be held in Nashik in December
Mahakavi Kalidas Din 2023 : नाशिकच्या वैभवात हरपले ‘कालिदासां’चे शिल्प; शहरीकरणासोबतच हरवली शिल्प

समस्या डॉ. पवार, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून केंद्राकडून, तर जिल्ह्यातील आमदारांच्या माध्यमातून राज्याकडून सोडविण्याचा प्रयत्न असेल. असोसिएशनतर्फे होत असलेली ही राज्यातील दुसरी सर्वांत मोठी नागरी सहकारी बँकांची परिषद आहे. ही परिषद सर्वसमावेशक असेल.

परिषदेच्या उद्‌घाटनासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, नॅफकबचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. समारोपासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकार आयुक्त अनिल कवडे यांना निमंत्रित केले जाईल. परिषदेच्या नियोजनात श्री. भुसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर यांचे सहकार्य लाभत आहे, असे सांगण्यात आले.

Dignitaries unveiling the insignia of the cooperation conference to be held in Nashik in December
Sakal Exclusive : इगतपुरी तालुक्यात रूग्णसेवेचा बोजवारा; आरोग्य केंद्र अन्‌ उपकेंद्राला चक्क कुलुप

सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे म्हणाल्या, की सहकारात सकारात्मक प्रवृती निर्माण व्हावी, सहकारी बँकांमधील सुसंवाद वाढावा, त्यातून विकासात्मक प्रश्नांना गती मिळावी, तसेच सहकाराच्या नव्या बदलाविषयी चर्चा व्हावी हा सहकार परिषदेचा उद्देश आहे.

नागरी सहकारी बँकांसमोर अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न व अभ्यासपूर्ण चर्चा, विचारमंथन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार परिषद महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांनी सांगितले. तसेच सहकार क्षेत्राला आधुनिक विचार व ऊर्जितावस्था येण्यासाठी, सहकार परिषदेच्या माध्यमातून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

त्यासाठी सहकार विभाग सहकार्य करेल, असे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी स्पष्ट केले. असोसिएशनचे संचालक वसंतराव खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धांजलीचे वाचन राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले. नानासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.

Dignitaries unveiling the insignia of the cooperation conference to be held in Nashik in December
Nashik Bar Council : नाशिक बार कौन्सिलला दुसऱ्यांदा ‘ISO’; देशभरात ठरली एकमेव असोसिएशन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()