BJP News : मी जे बोललो त्यात चूक काय? सहकार मंत्री अतुल सावे यांचे दाव्याचे समर्थन

Atul Save
Atul Saveesakal
Updated on

नाशिक : सहकारी संस्थांची नोंदणी सहकार विभागाकडे करायचे असेल तर भाजप जिल्हाध्यक्षांची अनुमती घ्या या सहकार मंत्री अतुल सावे यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिल्यानंतर आज पुन्हा सावे यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.

होय मी जे बोललो त्यात चूक काय? असा दावा करताना त्यांनी जिल्हाध्यक्षांनी लक्ष घातल्यास सोसायटी स्थापन करण्यास मदत करू याचा पुनरुचार केला. (Cooperation Minister Atul Save supports his claim maharashtra political devendra fadnavis amit shah bjp state executive meeting nashik News)

सहकारी सोसायटींकडे नोंदणी करायची असेल तर भाजपचा जिल्हाध्यक्षांची अनुमती घ्या असे वक्तव्य सहकार मंत्री अतुल सावे यांनी केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मात्र भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सहकार क्षेत्र कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी नसल्याचे सांगताना सावे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने सहकार मंत्री अतुल सावे यांनी पुन्हा तीच दोरी ओढली.

जिल्हाध्यक्षांना मी लक्ष घालण्याचे बोललो त्यांनी लक्ष घातले तर सोसायटी स्थापन करण्यास मदत करत, असे आश्वासित केल्याचे त्यांनी सांगितले. मी जे बोललो त्यात चूक काय? उलट नाना पटोले यांनीही मदत करावी, शेतकऱ्यांच्या विकास सहकाराच्या माध्यमातूनच होणार असल्याचे ते बोलले. सहकाराच्या बाबतीत बोलताना म्हणाले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा सहकारासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Atul Save
Political News : महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीबाबत संभाजी ब्रिगेडनंतर 'या' पक्षानं घेतला मोठा निर्णय!

देशात सहकरकारच्या माध्यमातून काम झाले पाहिजे व सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्यवहार चालवता येतील प्रत्येक गावात सोसायटी सुरू करत आहोत या आधी चार ते पाच गावातील सोसायटी असायची. आता सोसायटी वाढवण्याच्या कामाला गती देणार असल्याचे ते म्हणाले.

म्हणून शरद पवारांची नाराजी

देशाला अनेक वर्ष काँग्रेसचे पंतप्रधान मिळाले व शरद पवार अनेक वर्ष कृषी मंत्री होते. तरीही साखर कारखान्यांचा आयकर माफ करू शकले नाही. सहकार मंत्री अमित शहा यांनी आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला.

तो दिलासा काँग्रेस सरकार व शरद पवार देऊ शकले नाही म्हणून ते नाराजी व्यक्त करत असल्याचे सावे म्हणाले.

Atul Save
Maharashtra Politics : विरोधकांची डोकेदुखी वाढणार; अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.