Nashik News : सहकारी बँकांच्या एकरकमी कर्जफेडीला मुदतवाढ!

Cooperative banks one time loan repayment
Cooperative banks one time loan repaymentesakal
Updated on

Nashik News : सहकार बँकांचे थकीत कर्ज फेडीसाठी खातेदारांना एकरकमी कर्ज फेडीला (वन टाइम सेटलमेंट) पर्यायाला शासनाने मुदतवाढ दिली आहे. एकरकमी कर्जफेडीला मुदतवाढ मिळाल्याने राज्यातील सहकारी बँकांचा एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. (Cooperative banks one time loan repayment term extended Nashik News)

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जाच्या वसुलीसाठी सहकार आयुक्त व सहकार निबंधकांनी शासनाकडे एकरकमी कर्जफेडीच्या योजनेला मुदतवाढीची मागणी केली होती.

मुदतवाढीला मान्यता मिळाल्याने ३१ मार्च २०२४ पर्यत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या ४९ मधील तरतुदीनुसार रिर्झव बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सहकारी बँकांना कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांना काही सूट देता येणार आहे.

नागरी बँकांच्या एकरकमी

कर्जफेडीला मुदतवाढ मिळाल्याने ३१ मार्चपर्यंत अनुत्पादक कर्जाच्या संशयित (एनपीए) खात्यातील कर्जदारांना ही योजना लागू होणार आहे. त्यासाठी मार्च २२ अखेर अनुत्पादक कर्जाच्या वर्गवारीत समावेश झालेल्या व त्यानंतर संशयित बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्जरोख्यांना ही योजना लागू राहणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Cooperative banks one time loan repayment
Unseasonal Rain : सिन्नर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने घातला धुडगूस

मात्र बँकांची फसवणूक करून घेतलेली आणि जाणीवपूर्वक थकविलेली कर्ज फेडण्यासाठी मात्र ही योजना लागू होणार नाही. तसेच सहकारी संस्था आणि बँकांचे आजी- माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाईक किंवा भागीदार संस्थांना दिलेले अनुत्पादक कर्ज या योजनेसाठी लागू राहणार नाही.

५० कोटीहून अधिकचे कर्ज प्रकरणासाठी मात्र सहकार आयुक्त आणि सहकार निबंधकांची परवानगी लागणार आहे. एकरकमी कर्जफेड योजनेच्या लाभांसाठी थकबाकीदारांना २९ फेब्रुवारी २०२४ पर्यत अर्ज करावे लागणार आहे.

बँकेकडून द.सा.द.शे ६ टक्के दराने सरळ व्याज पद्धतीने तडजोडीच्या तारखेपर्यंत व्याजाची रक्कम आकारावी. तडजोड रक्कम निश्चित करून रक्कम कमी येत असल्यास कर्जदारास रक्कम परत न करता अशी रक्कम संबंधित कर्ज खाते योजनेर्तंगत बंद करावे.

Cooperative banks one time loan repayment
Raisin Market News : नाशिकचा बेदाणा देश-परदेशात ग्राहकांना हवाहवासा! २ हजार टनाची निर्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.