अबब! कोथिंबिरीला मिळाला हजारांत भाव; शेतकरी मालामाल

goods sold by the farmers are auctioned in the market committee.
goods sold by the farmers are auctioned in the market committee.esakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक बाजार समिती दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात गुरुवारी (ता.२२) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला सोळा हजार रुपये भाव मिळाला.

कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव,सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तसेच पुण्यातील खेड, मंचर येथूनही पालेभाज्यांची आवक होत असते. गुरुवारी सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. (Coriander priced at Rs 16000 in Nashik Market Committee Nashik Latest Marathi News)

goods sold by the farmers are auctioned in the market committee.
Nashik : शहरातील वाहतूक नियोजनासाठी समिती

शिवांजली कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील कोराटे गावातील शेतकरी सोमनाथ शिवाजी भंवर हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबिरीस सोळा हजार रुपये शेकडा बाजारभाव मिळाला. सदर कोथिंबीर संतोष भुजबळ या व्यापाऱ्याने घेतली असून मुलुंड, भांडूप व ठाणे येथील मार्केटला पाठविणार आहेत.

"नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्या या शेतमालाला लिलावाद्वारे योग्य बाजारभाव मिळत असतो. शेतकरी बांधवांनी त्यांचा शेतमाल नाशिक बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा." - अरुण काळे सचिव, नाशिक बाजार समिती

goods sold by the farmers are auctioned in the market committee.
Bogus Medical Certificate Case : पगारे याचाही अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.