फटाक्यांचे उत्पादन जोमात; उत्पादकांना मात्र तिसऱ्या लाटेची धास्ती

Fireworks manufacturer
Fireworks manufacturer esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) अद्याप संपलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता वर्तवली जात आहे. आगामी सण-उत्सव कोरोना नियमांचे (COVID Protocol) पालन करूनच साजरे करावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी दीपोत्सव लक्षात घेता सध्या फटाक्यांचे उत्पादन जोमात सुरू असले तरी उत्पादक सावधगिरी बाळगत आहेत.

कोरोना हद्दपार होऊन दिवाळी जोमात होईल…

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील फटाके उत्पादक मर्यादीत स्वरुपाच्या फटाक्यांचे उत्पादन घेत आहेत. मोठे व महागडे फटाके शिवाकाशीहून (Shivkashi) खरेदी करण्याचे बहुतांशी उत्पादकांचे नियोजन आहे. कोरोना हद्दपार होऊन दिवाळी जोमात होईल, अशी अपेक्षा या उद्योगाशी निगडीत हजारो कामगार व किरकोळ व्यावसायिकांना आहे. अलिकडच्या काळात फटाक्यांचा वापर नेहमी केला जातो. सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे, समारंभ, निवडणुका आदींच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी पहायला मिळते. दिवाळीत विक्रमी उलाढाल होत असल्याने उत्पादक सहा महिने आधीच फटाक्यांचे उत्पन्न वाढवित असत. गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली दीपोत्सव साजरा झाला. त्यामुळे फटाके व्यवसाय जेमतेमच होता. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी सावरली आहे. राज्यातील निर्बंध बऱ्यापैकी शिथील झाले आहेत. जनजीवन पुर्वपदावर आले आहे. बाजारपेठा, उद्योग-व्यवसायांना चालना मिळाली आहे. त्यामुळे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होईल, या अपेक्षेने उत्पादकांनी महिन्यापासून उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. एरव्हीपेक्षा निम्म्याने कामकाज सुरू आहे.

Fireworks manufacturer
नाशिक : जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा
Fireworks manufacturer
नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित
Fireworks manufacturer
Nashik : सात एकर कोबीवर रोटर

शेकडो प्रकारच्या फटाके निर्मितीवर भर...

फटाक्यांचे माहेरघर म्हणून शिवाकाशी ओळखले जाते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शिवाकाशीत फटाके बनविण्याची धूम सुरू आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप म्हणावा तसा कमी झालेला नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिपोत्सव आहे. त्यामुळे बहुतांशी कारखान्यांमधून फटाक्यांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास उत्पादकांसह हजारो किरकोळ व्यावसायिकांना दिलासा मिळेल. शिवाय फटाक्यांची आतीषबाजी दीपोत्सवात पाहता येईल. फटाका व्यवसायाचे अर्थकारण पूर्णपणे आगामी परिस्थितीवर अवलंबून आहे. परिस्थिती कशीही असली तरी सण साजरा होणारच असल्याने उत्पादकांचा भर फुलझाडी, छोटे बॉम्ब, लवंगी फटाके, तारकडी (सुसुंद्री), टिकली, बंदूक, भुईचक्कर, कोटी, नागगोळी, गुलकाडी, रॉकेट, आपटी बॉम्ब आदी शेकडो प्रकारचे फटाके बनविणार आहे.

यावर्षी चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा

''गेल्या महिन्यापासून फटाक्यांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. सध्या शंभर ते सव्वाशे प्रकारचे फटाके बनविले जात आहेत. मोठे फटाके शिवाकाशीहून मागविले जाणार आहेत. गणेशोत्सवापासून किरकोळ विक्रेत्यांची बुकींग सुरु होईल. यावर्षी दिवाळीत चांगला व्यवसाय होईल, अशी अपेक्षा आहे.'' - गोविंद शिरोडे, संचालक, सावित्री एजन्सी, पारोळा

Fireworks manufacturer
जनआशीर्वाद यात्रेत आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.