Nashik News : कोरोना मृत कर्जदारांना कर्जमाफी कधी ?

Corona Loan News
Corona Loan Newsesakal
Updated on

नाशिक : कोरोना संकटातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मृत झालेल्या कर्जदार रुग्णांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कोरोना संकटात निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत सहकार विभागाने माहिती मागविली आहे.

शासनाच्या या हालचालींवरून मोठा निर्णय होऊ शकतो, असे बोलले जात आहे. असे झाल्यास भविष्यात संबंधित कर्ज माफ केल्यास हजारो शेतकरी कर्जदारांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळू शकतो. (Corona dead borrower loan when waiver Information sought by government under cooperative department Nashik News)

Corona Loan News
Nashik Crime News : बच्चू कर्डेल खुनाच्या तपासासाठी अंबड पोलिसांची 6 विशेष पथके

जिल्ह्यात दोन वर्षे कोरोनाने हाहाकार उडवला. या संकटात अनेक घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कमवता माणूस गेल्याने त्यांच्या कुटुंबांना मोठी आर्थिक झळ बसली. यात अगोदरच सोसायट्या, बॅंकांतून घेतलेले पीककर्ज, पतसंस्थांचे कर्ज, त्यांचा सुरू झालेला तगादा सुरू आहे. यामुळे संबंधित कुटुंब मेटाकुटीस आले आहे. या कर्जापायी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबावर बेघर आणि भूमिहिन होण्याची देखील वेळ आली आहे.

कोरोनाने मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० हजारांची मदत मिळाली आहे. यातच शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कर्जाबाबत माहिती मागविली आहे. यात सहकारी विभागाकडून पतसंस्थेचे, नागरी बॅंकेचे संस्थेचे नाव, कोरोनाने मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव, मंजूर कर्जाची रक्कम, तारण मालमत्तेचा तपशील, थकीत कर्जाची एकूण रक्कम, एनपीए वर्गवारी, वसुलीची सद्यस्थिती माहिती संकलित करण्याच्या सूचना सहकार आयुक्त व निंबधक अनिल कवडे यांनी केल्या आहेत. ही माहिती मागविल्यानंतर शासन मृत कर्जदारांना कर्जमाफी देऊ शकते अन्यथा अन्य काही उपाययोजना करू शकतात, असे बोलले जात आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Corona Loan News
Nashik News : शेल्टर प्रदर्शनाला 30 हजार नागरिकांची भेट

कोरोनामुळे ८ हजार ९०४ जणांचा मृत्यू

जिल्हयात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात शासनाच्या पोर्टलवर ८ हजार ९०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात १५ हजाराहून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी सादर केलेली आहे. त्यामुळे कोणती माहिती अधिकृत हे समजू शकलेले नाही.

राष्ट्रीयकृत बॅंकेचे कानावर हात

एकाबाजूला सहकार विभागातून कोरोनात मृत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे, राष्ट्रीयकृत बॅंकांनी मात्र, आम्हाला असे कोणतेही आदेश नसल्याचे सांगत, कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकेतून पीककर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कुटुंब संभ्रमात पडले आहेत.

"जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कर्जाबाबत सहकार आयुक्तांनी माहिती मागविली आहे. त्यानुसार जिल्हा बॅंक, नागरी बॅंक, पतसंस्था यांना पत्र देत माहिती मागविली आहे. संकलित झालेली माहिती आयुक्तांकडे पाठविली जाईल."

- सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक जिल्हा

Corona Loan News
Nashik Crime News : गुन्हेगारीमुळे शहराची शांतता धोक्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()