निर्बंध लागल्यानंतर सेटवर मनुष्यबळ कमी करण्यावर भर
नाशिक : कोरोना संसर्ग(corona) वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले असून या निर्बंधाचा चित्रीकरणावरही(shooting) परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. नऊ ते सहा या वेळेत निर्बंध लागू असल्याने रात्रीच्या चित्रीकरणाचे चित्रण रद्द करण्यात आले असून, कोरोना वाढती रूग्णसंख्या पाहता सेटवरचे मनुष्यबळही(manpower) कमी करण्यात आली आहे.
कोरोना दुसऱ्या लाटेनंतर सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली होती. नाशिकमध्ये, वेबसिरीज, मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. सध्या दोन मालिकांचे चित्रीकरण शहराच्या जवळील परिसरात होत आहे. कोरोना निर्बंध लागू झाल्यानंतर चित्रीकरणाला पुन्हा एकदा फटका बसत असल्याचे चित्र आहे. निर्मात्यांना कोरोनाचे नियम पाळत चित्रीकरण करावे लागत असून, तांत्रिक बाबी, कॅमेरा ऑपरेशन, मेकअपमॅन, एडिटिंग, सेट उभारणे आदींचे मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे. यात चित्रीकरणावर निर्बंध लागल्यास मालिका, निर्मात्यांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडणार आहे. कोरोना पहिल्या दोन लाटांमध्ये निर्मात्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. निर्बंध लागल्यास पुन्हा शिथिल होण्यास मोठा विलंब होत असल्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे.त्यामुळे निर्बंध लावताना चित्रीकरणातील सर्वच घटकांचा विचार व्हावा अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना निर्बंध लागू झाल्यानंतर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेच्या सेटवरचे मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे.
- संजय झनकर, निर्माता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.