Corona अर्थसाहाय्याचे 1 हजार अर्ज फेटाळले

Form Rejected
Form Rejectedesakal
Updated on

नाशिक : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना शासनाकडून अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. नऊ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील एक हजार अर्ज वैद्यकीय विभागाने (Health Departement) फेटाळले आहेत. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांनी अर्ज केल्याने अर्ज फेटाळण्यात आले.

Form Rejected
Corona Updates: तिसरी लाट आटोक्यात

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेमार्फत राज्य शासनाकडे अर्ज दाखल केले जात आहे. नाशिक महापालिका (NMC) हद्दीत पात्र कुटुंबीयांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. नऊ हजार अर्जांपैकी जवळपास एक हजार अर्ज नाकारण्यात आले. एकाच कुटुंबातील एकपेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्याचे छाननीत स्पष्ट झाल्याने तसेच अर्ज भरण्यातील त्रुटी, बँकेची माहिती न देणे या कारणांमुळे अर्ज फेटाळण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. नाकारण्यात आलेले अर्जदारांना जिल्हाधिकारी (Collector) , जिल्हा रूग्णालय व महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या तक्रार निवारण समित्यांकडे अपील करता येणार आहे.

Form Rejected
Corona : मुलांसाठीच्या आणखी एका लसीला DCGI ची मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.