दिलासादायक! नाशिक शहरात कोरोना रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

coronavirus recovery rate
coronavirus recovery rateGoogle
Updated on
Summary

शहरात कोरोना वाढीचा वेग नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत पोचल्याने वैद्यकीय सेवांवरील ताण कमी झाला आहे.

नाशिक : मार्च महिन्याच्या सुरवातीपासून शहरात सुरु झालेली कोरोना संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शहरात कोरोना वाढीचा वेग नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ टक्क्यांपर्यंत पोचल्याने वैद्यकीय सेवांवरील ताण कमी झाला आहे. corona patients recovery rate in nashik city has reached 96 percent

वैद्यकीय विभागाला दिलासा

मार्च व एप्रिल हे दोन महिने शहरासाठी घातक ठरले. या दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग उच्चतम पातळीवर होता, तर मृत्यूदरातदेखील मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत एक लाख रुग्णसंख्या या दोन महिन्यात वाढली. वाढत्या रुग्णसंख्येनुसार महापालिकेने नवीन बिटको, डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयासह ठक्कर डोम, समाजकल्याण, मेरी, संभाजी स्टेडिअम येथे कोविड सेंटर सुरु केले. त्यानंतर शहरात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु झाली. परिणामी गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाला दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण नाशिकमध्ये वाढले आहे. शहरात ९६. ६८ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. एकूण कोरोना रुग्ण २,२०,७३३ आढळले असून कोरोनामुक्त झालेले २,१३,४०० रुग्ण आहेत. तर ५,४८४ रुग्ण घरी उपचार घेत आहेत.

coronavirus recovery rate
नाशिक जिल्‍ह्यात आज 677 पॉझिटिव्‍ह, 1 हजार 349 कोरोनामुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.