नाशिकमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागणार? छगन भुजबळ यांनी दिले संकेत

कोरोना
कोरोना
Updated on

नाशिक - देशात तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रार्दुभाव सातत्याने वाढत असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. त्यामुळे आज सायंकाळी नाशिक शहर जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध आणखी कडक होणार आहेत, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सायंकाळी कोरोना आढावा बैठक होणार असून  त्यात निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.  कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी 4 वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.

रुग्ण वाढीचा वेग एकास दहा

जिल्ह्यात २८ डिसेंबरला ४२१ असलेली कोरोनाची रुग्णसंख्या ५ जानेवारीला १४६१ झाली. आठवड्यात हजार रुग्ण वाढले. यात अखेरच्या एका दिवसात पाचशे रुग्ण वाढले. शहर - जिल्ह्यात सर्वत्र रुग्ण वाढत आहे. शहर ग्रामीण भागाततालुक्यात रुग्ण वाढत आहे. पूर्वी एका रुग्णामुळे दोन जण वाढायचे आता (१ः १०) दहा जण वाढत आहे.

निर्बंध कडक होतील

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सायंकाळच्या बैठकीत निर्णय होईल लॉकडाउन हा उपाय नाही. त्यातून गोरगरीब अडचणीत येतात. त्यामुळे सर्वंकष विचार करुन निर्णय घ्यावा लागेल.मास्क वापरा, अंतर ठेवा. कार्यक्रमाला गर्दी करु नका. सातत्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध गरजेचे आहे

कोरोना
पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाचीच, पण घटनेला दोन बाजू - छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.