Nashik Corona Update : शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सध्या तरी नाही. परंतु नव्या ‘व्हेरियंट’ बाबत सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर खोटे संदेश पसरणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारने महापालिकेला दिल्या आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरविण्यावर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात महापालिकेने शुक्रवार (ता. २२) पासून कोरोना चाचणी करण्यासाठी मॉडीक्युलर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona Update Modular Lab at Bytco Hospital commissioned nashik news)
दोन वर्षाच्या खंडानंतर कोरोना पुन्हा परतला आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत शहरात चार लाखासंह अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, तर चार लाखांहून अधिक रुग्णांचा बळी गेला होता. २०२२ नंतर टप्प्याटप्प्याने कोरोना प्रादुर्भाव कमी झाला. कोरोना होता की नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच केरळ राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आला.
राज्यातही कोल्हापूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, तर ठाणे जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्ण आढळल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, तसेच मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दृकश्राव्य माध्यमातून महापालिकेच्या आयुक्त व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पीपीई किट, राखीव बेड, मास्क, ऑक्सिजन व्यवस्था, जम्बो सिलिंडर, औषध साठा याची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे डोकेदुखी, सर्दी, ताप, घसा खवखवणे यासारखी लक्षणे आढळल्यास कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेने राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट रुग्ण आढळल्यानंतर नाशिक रोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (बिटको) व कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्याचे सूचना दिल्या.
संशयितांच्या चाचण्या सुरू
महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना संशयितांच्या चाचण्या घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयातील कोरोना टेस्टिंग मोडीक्युलर लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर अफवा पसरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना असल्याने त्या अनुषंगाने सोशल मीडियावर नजर ठेवण्यात आली आहे.
नाशिक शहरामध्ये कोरोना लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये, मात्र कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यांबरोबरच सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी व घसा खवखवण्याची लक्षणे आढळून आल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
"शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. परंतु नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये." - डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.