येवल्यात कोरोना रुग्णसंख्या थांबता थांबेना!

Corona Update
Corona Updategoogle
Updated on

येवला (जि. नाशिक) : सर्वत्र दुसरी लाट ओसरत असून, शहर, तालुक्यानेही या लाटेला बऱ्यापैकी नियंत्रित केले आहे. शहरात तर रोज हा आकडा शून्य किंवा एकवर मर्यादित असताना ग्रामीण भागात मात्र रोजच पाच ते दहाच्या दरम्यान कोरोनाबाधित निघत असल्याने चिंता वाढतच आहे. ग्रामीण भागात मागच्या १७ -१८ दिवसांत तब्बल शंभर, तर गेल्या तीन दिवसांत ३० रुग्ण निघाल्याने पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. (corona update patients in yelola taluka are increasing)


कोरोनाच्या पहिल्या लाटेने शहराला वेठीस धरले होते. दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात हीच अवस्था होती. मात्र, गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शहरातील संख्येवर अचानकपणे नियंत्रण आले आहे. रोजच शून्य किंवा एक, तर आठवड्यातून दोन किंवा तीन रुग्ण शहरात निघतात. याउलट ग्रामीण भागात मात्र बाधितांचा आकडा रोजच वाढत आहे. पाच ते दहाच्या आसपास संख्या रोजच सुरू असून, ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात केव्हा येणार, याची प्रशासनासह नागरिकांना चिंता लागली आहे. राजापूर येथे विवाह समारंभासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण बाधित निघाले. त्यामुळे नागरिक दक्ष झाले असून, काळजी घेतली जात आहे.
ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने गर्दी व संपर्क कमी असला तरी हार्ड इम्युनिटी व लसीकरणाचे प्रमाण अल्प असल्याने बाधितांचा आकडा वाढत आहे. गंभीर म्हणजे ग्रामीण भागातील अनेक नागरिक मास्क व सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा दावा होत आहे. प्रशासनाकडून जनजागृती व उपाययोजना सुरू असल्या तरी नागरिकांचीही साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल ३० रुग्ण निघाल्याने चिंतेत अजूनच वाढ होत आहे. यामुळे शहरातील नागरिकही धास्तावलेले दिसत असून, ग्रामीण भागातील नागरिकांनी मास्कसह नियमांचे पालन करण्याची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.



खेड्या-पाड्यातील रुग्णसंख्या शून्यावर येत नसल्याने आता सर्वांची जबाबदारी वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लसीकरण, मास्कच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे. घराबाहेर पडल्यावर मास्क वापरावा. वेळोवेळी सॅनिटाइझर फवारणी करवी, लग्न-समारंभात होणारी गर्दी टाळावी.
-डॉ. सुधीर जाधव, माजी सभापती, बाजार समिती, येवला

Corona Update
पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात


…असे आहेत आकडे

आतापर्यंत बाधित - पाच हजार ५०१
(शहर- एक हजार ३६१, ग्रामीण- चार हजार १५०)
बरे झालेले - पाच हजार १८६
(शहर- एक हजार ३०१, ग्रामीण- तीन हजार ८७८)

एकूण मृत्यू - २५१ (शहर - ५८, ग्रामीण - १९१)
उपचार घेणारे - ६४



ग्रामीण भागात मागील १७ दिवसांत निघालेले रुग्ण

जून महिना

तारीख - बाधित

  • २४ - पाच

  • २५ - सहा

  • २६ - एक

  • २७ - चार

  • २८ - दोन

  • २९ - सहा

  • ३० - चार

Corona Update
पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला
  • जुलै महिना

  • तारीख १ - तीन

  • तारीख २ - पाच

  • तारीख ३ - पाच

  • तारीख ४ - सहा

  • तारीख ५ - नऊ

  • तारीख ६ - नऊ

  • तारीख ७ - चार

  • तारीख ८ - दहा

  • तारीख ९ - सात

  • तारीख १० - १३

(corona update patients in yelola taluka are increasing)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()