नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा हजाराच्‍या उंबरठ्यावर!

corona
coronasakal
Updated on

नाशिक : जिल्‍ह्यात किरकोळ स्‍वरूपात कोरोना रुग्‍णसंख्येत वाढ होत आहे. सोमवारी (ता. ३०) जिल्‍ह्यात ८२ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. ५९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली, तर तीन बाधितांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २० ने वाढ झाली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९८० बाधितांवर उपचार सुरू आहेत. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या पुन्‍हा एक हजाराच्‍या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे.


सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील २७, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ४७, मालेगावच्‍या एकासह जिल्‍हाबाहेरील सात रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. दिवसभरात तीन बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. या तीन मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक, तर नाशिक ग्रामीणमधील दोघा मृतांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ९६७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ५०४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील २३६, नाशिक शहरातील २२७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६५८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ६३३ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक ग्रामीणचे २२, मालेगावच्‍या एका रुग्‍णाचा समावेश होता.

corona
नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन
corona
दहावी, बारावी अनुत्तीर्णांची 'परीक्षा'; संभाव्‍य तारखा जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.