चांदोरी : लसीकरणाचे प्रबोधन (corona vaccination awareness) व्हावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र डोंगरवाडी दारणा सांगवीत निफाड मध्ये एका लग्न सोहळयात (Marriage ceremony) चक्क वऱ्हाड्यांचं लसीकरण (people vaccination) करण्यात येत आहे. तसंच, लसीकरणाचं प्रमाणपत्र (vaccination certificate) असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जातोय. या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
लग्न सोहळ्यात आलेल्या नातेवाईंकांचे लसीकरण झाले नसेल तर तिथेच सोहळ्यातच लस देण्यात येते. त्यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरू आहे. डोंगरवाडीचे वाल्मिक रोहम यांची कन्या माधुरी आणि निरपूर ता सटाणा येथील संजय चव्हाण यांचा मुलगा सौरभ यांचा विवाह सोहळा १० फेब्रुवारी २०२२ रोजी डोंगरवाडी,दारणासांगवी ता निफाड येथे आयोजित करण्यात आला होता. संयोजकांनी लसीची सक्ती केली आहे. लग्नात होत असलेल्या लसीकरणाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अॅड नितीन ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे,डॉ प्रल्हाद डेर्ले,जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक पिंगळे,सरपंच कांतीलाल बोडके,सुनील साळवे,पोलीस पाटील गोरक्षनाथ काकड,सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी,तलाठी कल्पना पवार आदींच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक अरुण कहांडळ,आरोग्य सेविका प्रिती इंगळे,धनु दरेकर,आशा सेविका वर्षा आहेर यांनी लसीकरण केले.
रोहम व चव्हाण परिवाराने लग्ना निमित्ताने लसीकरण करत प्रशासनाला सहकार्याचा नवीन पायंडा पाडला. कौतुकास्पद असा निर्णय इतरांनीही याचे अनुकरण करावं.
- सचिन पाटील , ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
आरोग्य सेवा करताना प्रामुख्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याला प्राधान्य देत आहोत. आजही विवाहाच्या निमित्ताने लसीकरण कॅम्प लावला.
- अरुण कहंडाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.