Nashik : मनपाचे 1 लाख वृक्षलागवडीचे नियोजन

plant plantation
plant plantationesakal
Updated on

नाशिक : गोदावरी तिरासह शहरातील सहा विभागात यंदाच्या हंगामात एक लाख वृक्षारोपण (Tree Planatation) केले जाणार आहे. त्यासाठी रोपांची जमवाजमव सुरू असून, वनविभागाकडून (Forest department) काही रोपे घेतली जाणार आहे. नागरिक व विविध सामाजिक, शैक्षणिक, वृक्षप्रेमी संघटना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली. (Corporation plans to plant 1 lakh trees Nashik News)

महापालिकेच्या रोपवाटिकेत रोपे तयारी करण्याचे काम सुरू आहे. तर उर्वरित रोपे प्रादेशिक वनविभागाकडून घेतली जाणार आहे. शहरातील वाहतुकीच्या रस्त्यासह इतर मुख्य रस्त्यांशेजारी मोठया प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. महापालिकेचा उद्यान विभाग त्या दृष्टीने तयारी करत आहे. शहरात तीन- चार वर्षापासून वृक्षारोपणात सहभाग वाढला असून झाडांविषयी जागृकता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून या मोहिमेला सुरवात होणार आहे. विविध संघटनांसह, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग या मोहिमेतून दिसणार आहे. देशी प्रजातीचे रोपांना प्राधान्य दिली जाणार आहेत.

plant plantation
ब्लॅक स्पॉट बाबत शहरात सर्व्हेक्षण; शहर घाण करणाऱ्यांना बसणार चाप

नाशिक शहरात झाडांचे प्रमाण चांगल्या प्रमाणात दिसून येते. मुख्य वाहतुकीचे रस्ते आहे. त्यात असलेल्या दुभाजकांमध्ये शेरा प्रजातीचे झाड लावले जाणार आहे. यासाठीचे रोपे तयार केले जात आहे. असेही श्री. मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या मोकळ्या जागा आहेत. त्याची जबाबदारी त्या परिसरातील नागरिकांवर देऊन वृक्षारोपण केले जाणार आहे. स्थानिक नागरिकांना याचे पालकत्व दिले जाणार असून ज्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी असेल त्यांनी तेथे झाडे लावायचे आहेत.

plant plantation
राष्ट्रीय महामार्गावर 5 महिन्यात 94 अपघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.