शिक्षण विभागाकडून प्रश्नांचा पत्रप्रपंच

शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी माहिती संकलनाकडे दुर्लक्ष
Education
EducationSakal
Updated on

नाशिक: महाराष्ट्रातील शिक्षण विभागात पत्राचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्याचे अवर सचिव सुनील हंजे स्वतःच्या स्वाक्षरीने तातडीने माहिती मागविण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना काढतात तर विभागीय आयुक्त शिक्षण अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकारी हे गट शिक्षणाधिकारी यांना पत्र काढतात. जिल्हा परिषद व खासगी शाळेतील पीएच.डी. व नेट- सेटधारक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी हा पत्राचा खेळ गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे व तत्काळ माहिती हवी आहे.

Education
मोठी बातमी! PM मोदी करणार पुतीन यांना फोन; भारत मध्यस्थ होणार?

असा उल्लेख या पत्रांमध्ये आवर्जून असतो हे विशेष. या पत्रांच्या अंमलबजावणी संदर्भात विचारणा केली असता कुणाकडेही माहिती उपलब्ध नाही. हंजे यांच्या स्वाक्षरीने १४ फेब्रुवारीला पुन्हा लिहिलेल्या पत्रात शेवटी तसाच उल्लेख नमूद असून अद्याप आपल्याकडून माहिती प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. संभाजी पाटील निलंगेकर, बच्चू कडू, किशोर दराडे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, डॉ. सुधीर तांबे, मंगेश चव्हाण, कपिल पाटील, सुरेश धस आदी विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी तारांकित प्रश्न वेळोवेळी विचारले. मात्र, गेल्या दोन वर्षांत राज्यात जिल्हा परिषद व खासगी संस्थांमध्ये पीएच.डी व नेट सेट शिक्षक किती आहेत, याबद्दल माहिती संकलित झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.