Nashik: जिल्ह्यात 6 हजारावर पत्रव्यवहार, फाईलिंग ऑनलाइन; ऑपरेटर सहाय्यक कम ड्रायव्हर असा नव्या प्रकाराचा जन्म

प्रशासकीय कामकाजात संगणकीकरण वाढवून कामकाजात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी सुरु झालेल्या ई ऑफीस प्रणालीने जिल्ह्यात बाळसे धरले आहे.
Online filling
Online fillingSakal Media
Updated on

Nashik : प्रशासकीय कामकाजात संगणकीकरण वाढवून कामकाजात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी सुरु झालेल्या ई ऑफीस प्रणालीने जिल्ह्यात बाळसे धरले आहे. एकट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सहा हजारावर पत्रव्यवहार ऑनलाइन झाला आहे.

मात्र यातून ऑपरेटर सहाय्यक कम ड्रायव्हर असा नवाच प्रकार सुरु झाला आहे.()

जिल्हा परिषदेसह अनेक विभागाची गती मात्र संथ असली तरी यंदाच्या वर्षात जिल्ह्यात बहुतांश कामकाज ऑनलाइन होण्याची आशा आहे. केंद्र शासनाने प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेसाठी ई ऑफीस प्रणाली सुरु केली. त्याची काही महिन्यांपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. ई ऑफीस प्रणाली सुरु झाल्यापासून एकट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ हजारावर फायली आणि ६ हजारावर पत्रांचा प्रवास ऑनलाइन सुरु झाला आहे.

कागदोपत्री पत्रव्यवहार करणे तो नोंदवून घेण्यासह त्यावरील निर्णय, अंमलबजावणी आदींसह कामकाजात गतीमानता आणि पारदर्शकता येऊ लागली आहे. देशातील सगळ्याच यंत्रणांचे कामकाज पारदर्शक होत असताना जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्येही ई. ऑफीस प्रणाली रुजू लागली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात सध्या पूर्णपणे ई ऑफीस प्रणाली सुरु झाली आहे. ई ऑफीस प्रणाली सुरु झाल्यापासून मंत्रालयात होणारा पत्रव्यवहार, मंत्रालयातून होणारा पत्रव्यवहार, विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील कामकाज, महसूल कार्यालयातील अंर्तगत कामकाज असे सगळेच कामकाज आता ई ऑफीस प्रणालीनुसार सुरु झाले आहे.

सुरवातीला प्रत्यक्ष येणाऱ्या तसेच ऑफलाइन होणाऱ्या फायली आणि इतर कामकाजाची संख्या वाढल्यास तो नोंदवूनच पुढे पाठविण्याची गती कमी असली तरी शंभर टक्के ई ऑफीस प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम मात्र गतीने सुरु आहे.

Online filling
Nashik News : काळे झेडें दाखविण्याची भीती; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

उत्पादन शुल्कही आघाडीवर

जिल्हाधिकारी कार्यालयाशिवाय आदिवासी विकास विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात ई ऑफीस प्रणाली सुरु करण्यात आली आहे. परिणामी ऑनलाइन कामकाजात सुसूत्रता दिसायला लागली आहे.

यंदाच्या २०२४ या नवीन वर्षापासून सगळेच कामकाज ऑनलाइन झाल्याने महसूल विभागातील गैरसोयीच्या वाटणाऱ्या पत्रव्यवहार आणि कामकाजाला दडवून ठेवण्याच्या वृत्तीला आता वाव कमी झाला आहे. ई ऑफिसच्या कामकाजाची गती कमी असल्याने त्यातून आता इतर दिवसांचे कामकाज शनिवारी आणि रविवारी कार्यालयातून बसून उरकण्यासारखे प्रकार सुरु झाले आहे.

चहा पेक्षा किटलीच गरम

ऑनलाइन कामकाजाशी जुळवून घेण्यात अजूनही अडचणी येत असलेल्या काही विभागात मात्र त्यावर तोडगा काढला जात आहे. त्यातून ऑपरेटर सहाय्यक अशा नावाने खासगी लोकांकडून काम करून घेण्याची नवीन पद्धत सुरु झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांना ऑनलाइन कामकाज जमत नाही किंवा अडचणी येतात अशा मंडळीनी स्वतःच्या वाहनासाठीचा चालक कम संगणक ऑपरेटिंग जमत असलेल्यांच्या सहाय्यक म्हणून मदत घेण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे सुट्टीच्या शासकीय कार्यालयातील भाउसाहेबांसोबत असे त्यांनी पदरमोड करीत भरलेले ऑपरेटर सहाय्यकांचा दबदबा वाढू लागला आहे. परस्पर हे चालक कम ऑपरेटर कम सहाय्यक लोकांशी संपर्क साधू लागल्याने नव्या प्रणालीचा नवा धोका जन्माला येतो आहे.

Online filling
Nashik News: ऑनलाईन औषध विक्रीवर लवकरच निर्बंध : मंत्री धर्मारावबाबा आत्राम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.