Cough Cure Remedies: सावधान! खोकल्‍यावर घरगुती उपचार...ठरू शकतो धोकादायक; व्‍हायरल ब्राँकायटिस’चा संसर्ग वाढला

Cough Cure Remedies Home Remedies Can Be Dangerous nashik news
Cough Cure Remedies Home Remedies Can Be Dangerous nashik news
Updated on

Cough Cure Remedies: वातावरणातील बदल आरोग्‍यासाठी आव्‍हानात्‍मक ठरत असून, वेगवेगळ्या व्‍याधींमध्ये वाढ झालेली आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात सर्दी- पडश्‍यासोबत न थांबणाऱ्या खोकल्‍याच्या तक्रारीच्‍या रुग्‍णांची संख्या वाढते आहे.

बहुतांश वेळा मेडिकल दुकानातून वैयक्‍तिक पातळीवर औषध खरेदी करत किंवा घरगुती उपायांतून उपचार करण्यावर अनेकांचा भर असतो. परंतु हा खोकला ‘ब्राँकायटिस’ शी निगडित असल्‍याने तज्‍ज्ञ मार्गदर्शनाखाली योग्‍य उपचार न घेतल्‍यास हा आजार धोकादायक ठरू शकतो, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. (Cough Cure Remedies Home Remedies Can Be Dangerous nashik news)

सामान्‍यतः पावसाळ्याच्‍या कालावधीत ‘ब्राँकायटिस’ आजार उद्‌भवत असतो. परंतु गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणात रोज बदल घडत असून, काही वेळा ढगाळ वातावरण, काहीवेळा धुक्‍याचा अनुभव येतो आहे. त्यामुळे हिवाळ्याच्‍या हंगामातही आजाराने आपले पाय पसरविले असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

विशेष म्‍हणजे सर्वसामान्‍यांना याबाबत कल्‍पना नसल्‍याने खोकला जाणवल्‍यास अनेकांकडून वैयक्‍तिक स्‍तरावर तात्‍पुरत्‍या स्वरूपाचे उपचार घेण्यावर भर दिला जातो. ही बाब अत्‍यंत घातक असून, गंभीर स्वरूपाच्या विकारासाठी कारणीभूत ठरु शकते असे तज्‍ज्ञ सांगतात.

‘ब्राँकायटिस’ची लक्षणे

- रुग्‍णाच्‍या श्वासनलिकेत सूज येणे.

- खूप प्रमाणात आणि न थांबणारा खोकला

- अधिक प्रमाणात कफ बाहेर पडणे

- श्‍वासनलिकेत अवरोध येणे, श्‍वसनास त्रास होणे

- एक्युट ब्राँकायटिसमध्ये सर्दी, तापाची तक्रार

- लहान मुलांमध्ये या स्वरूपाच्या आजाराचे प्रमाण अधिक.

- क्रॉनिक ब्राँकायटिसमध्ये खोकला, कफाचे प्रमाण अधिक.

- योग्‍य उपचाराअभावी बरे होण्यास लागू शकतात अनेक महिने.

Cough Cure Remedies Home Remedies Can Be Dangerous nashik news
Lungs Cough Relief : हिवाळ्यात छातीतील कफ दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर

- फुफ्फुसांना होऊ शकते कधीच भरून न येणारे नुकसान.

असा करा बचाव

सुकामेव्‍याचे सेवन उपयुक्‍त ठरू शकते. यामध्ये बदाम, अक्रोड प्रभावी ठरतात. काढा, ग्रीन टी आणि भाज्यांचे सूप उपयुक्‍त ठरतात. संसर्गापासून वाचण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात घ्यावे. हळद, आलं, लसूण या घटकांचा आहारात समावेश असावा. तळलेले पदार्थ, कच्चा भाजीपाला खाण्याचे टाळावे. हे बचावात्‍मक उपाय असून, आजाराची लक्षणे उद्‌भवल्‍यास उपचार महत्त्वाचाच ठरतो. आरोग्‍यविषयक तक्रार उद्‌भवल्‍यास वैयक्‍तिक स्‍तरावर उपचार न करता तज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार पूर्ण करावे.

"खोकल्‍याच्‍या रुग्‍णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बदललेल्‍या वातावरणात विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. दोन-तीन दिवस औषध घेऊनही खोकला बरा न झाल्‍यास फिजिशियन, चेस्ट फिजिशियनचा सल्‍ला घ्यावा. घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नये. वयोवृद्ध, श्‍वसनविकार असलेले, लहान मुले, गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी. व्‍यायाम, पौष्टिक आहार व योग्‍य वेळी, योग्‍य डॉक्‍टरांचा सल्‍ला घेतल्‍याने पुढील गुंतागुंत टाळता येईल." - डॉ. स्वप्नील सांखला, नारायणी हॉस्‍पिटल.

"लहान मुले, वयस्‍कर व्‍यक्‍तींमध्ये ८ ते १५ दिवस खोकला जात नसल्‍याच्‍या तक्रारी वाढत आहेत. दीर्घ आजारपणातून न्‍युमोनियासारखे आजार उद्‌भवत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्‍यास कोविडच्‍या चाचण्या पुन्‍हा सुरू कराव्‍या लागतील. नागरिकांनी गर्दीच्‍या, धुळीच्‍या ठिकाणी जाणे टाळावे. शाळांमध्ये स्‍वच्‍छता राखली जावी. अचानक होणाऱ्या वातावरणीय बदलांमध्ये सावधगिरी बाळगावी. - डॉ. प्रकाश पाटील, जनरल फिजिशियन.

Cough Cure Remedies Home Remedies Can Be Dangerous nashik news
Healthy Soups for Cold-Cough : सर्दी-खोकल्यापासून आराम देतील ‘हे’ हेल्दी सूप्स; बनवण्याची पद्धत घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.