SSC HSC Examination: पुरवणी परीक्षेसाठी समुपदेशन सुविधा; दहावी, बारावीतील विद्यार्थी अन् पालकांसाठी सुविधा

exam
examsakal
Updated on

SSC HSC Examination : जुलै व ऑगस्‍ट महिन्‍यात शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्‍या पुरवणी परीक्षा घेतल्‍या जाणार आहेत.

या कालावधीत शिक्षण मंडळातर्फे समुपदेशन सुविधा उपलब्‍ध केली जाणार असून, विद्यार्थी व पालकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. (Counseling facility for supplementary examination Facilities for 10th 12th students and parents nashik)

या संदर्भात शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केलेले आहे. परिपत्रकात म्‍हटले आहे, की परीक्षा कालावधीदरम्‍यान परीक्षा, अभ्यासाचा ताण-तणाव आणि परीक्षेविषयी भीती अशा विविध कारणांनी विद्यार्थ्यांमध्ये दडपण येते.

नकारात्‍मक विचारांतून विद्यार्थी काही वेळा टोकाची भूमिका घेतात. अशा विद्यार्थ्यांना योग्‍य मार्गदर्शन व निकोप वातावरणात परीक्षा होण्यासाठी विभागीय मंडळाच्‍या स्‍तरावर समुपदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

exam
Nashik: निमा पदाधिकाऱ्यांनी मांडला समस्यांचा पाढा; प्रश्न मार्गी लावण्याचे MIDCचे गवळी, झांज्जे यांचे आश्वासन

विद्यार्थ्यांनी ताण-तणाव विषयक समस्‍यांचे, शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी व पालकांना समुपदेशकांना संपर्क साधता येईल. येत्‍या १८ जुलैपासून तर ८ ऑगस्‍ट या दरम्‍यानच्‍या कालावधीत समुपदेशन सुविधा उपलब्‍ध राहणार असल्‍याचे कळविले आहे.

जिल्‍हानिहाय समुपदेशक असे-

किरण बावा ९४२३१८४१४१ (नाशिक जिल्‍हा), नंदकिशोर बागूल ९४२०८५२५३१ (धुळे), प्रमोदिनी पाटील ९४०४५९४१८६ (जळगाव), राजेंद्र माळी ९४०४७४९८०० (नंदुरबार) यांना संपर्क साधता येईल.

exam
Nashik News: गड, किल्ल्यांवर मद्यसेवन केल्यास कायदेशीर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.