Nashik ZP News : जिल्हा परिषदेत बदलीपात्र अधिकाऱ्यांचा Countdown! सोयीच्या बदलीची शक्यता धूसर

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेत पाच विभागप्रमुख बदलीपात्र असून, राज्य शासनाने कळविल्यानुसार विकल्पाचे अर्जही भरून दिले आहेत. मात्र, यंदा सोईच्या बदल्यांसाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

त्यामुळे सोयीच्या बदलीची शक्यता धूसर होत असल्याने, तसेच पुढील महिन्यात बदली कोठे होणार याबाबत कोणताही अंदाज या अधिकाऱ्यांना येत नाही. परिणामी बदलीपूर्वी हातातील कामे पूर्ण करण्यावर त्यांचा भर असला, तरी त्यांनी कार्यकाळाचा काऊंट डाऊन करण्यास सुरवात केली आहे. (Countdown of transferable officials in Zilla Parishad prospect of convenient replacement dim Nashik News)

शासकीय सेवतील ग्रामविकास विभागातील वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची नियुक्तीनंतर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शासनाने वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची बदली प्रक्रीया राबविली नाही.

जिल्हा परिषदेत वर्ग एकचे असे तब्बल पाच अधिकारी आहेत. यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, ग्रामपंचायतीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक चाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने मागविल्यानुसार या अधिकाऱ्यांनी विकल्पही भरून दिले आहेत. त्यानंतर सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी या अधिकाऱ्यांकडून फिल्डींग लावली जात असल्याचे बोलले जाते. मात्र, यंदा महत्वाच्या जागांसाठी मोठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ZP Nashik latest marathi news
Cidco Shootout Case : खातमा करायच्या इराद्यानेच कोष्टीवर हल्ला; तीक्ष्ण हत्यारांसह गुन्ह्यातील रिक्षा जप्त

त्यामुळे अपेक्षित जागेवर बदली होण्याची आशा मावळल्याने अधिकारी वर्गात नाराजीचा सूर आहे. महत्वाच्या जागांसाठी स्पर्धा वाढल्याने नेमकी बदली कोठे होणार, याचा अंदाज कोणालाही येत नाही.

त्यामुळे आपण जिल्ह्यात राहू की नाही, याबाबतचा अनुमानदेखील लावता येत नसल्याने या अधिकाऱ्यांकडून कामे आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. विभागात स्वतःहून आपल्या कामांचे तर, काही अधिकाऱ्यांनी काऊंट डाऊन सुरू केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

ZP Nashik latest marathi news
Nashik Market Committee Election : 12 दिवसांत एकही माघार नाही; नाशिक बाजार समिती निवडणूक होणार रंगतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.