Nashik: देशाच्या निर्यातीत गतवर्षांपेक्षा 2 टक्क्यांनी वृद्धी! गेल्या महिन्यात निर्यात 65.02 अब्ज अमेरिकी डॉलर

india's imports and exports
india's imports and exportsesakal
Updated on

Nashik : देशाची एप्रिल २०२३ मध्ये एकूण निर्यात ६५.०२ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे. एप्रिल २०२२ च्या तुलनेत त्यात दोन टक्क्यांनी वृद्धी झाली आहे.

त्याचवेळी गेल्या महिन्यात ६६.४० अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आयात झाल्याचा अंदाज असून, आयातीत एप्रिल २०२२ च्या तुलनेत ७.९२ टक्क्यांनी घट झाली आहे. (countrys exports increased by 2 percent over previous years Exports last month 65 billion US dollars Nashik news)

इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांदूळ, औषधे आणि फार्मास्युटिकल्स, तेलबिया, सिरॅमिक उत्पादने, काचेच्या वस्तू व मसाल्यांच्या गेल्या महिन्यातील निर्यातीत वाढ नोंदवली. माल व्यापारामध्ये एप्रिल २०२२ मध्ये ३९.७० अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात झाली होती, तर गेल्या महिन्यात ३४.६६ अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात राहिली.

गेल्या महिन्यातील इतर निर्यात अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात एप्रिल २०२२ मधील निर्यात अब्ज डॉलरमध्ये दर्शवते) : खनिज तेलविरहित, रत्नेविरहित आणि दागिने- २५.७६ (२८.३७), सेवा- ३०.३६ (२४.०५),

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू- २.११ (१.६७). गेल्या महिन्यातील आयात अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात एप्रिल २०२२ मधील आयात अब्ज डॉलरमध्ये दर्शवते) : व्यापार माल- ४९.९० (५८.०६),

बिगर- पेट्रोलियम आणि बिगररत्ने आणि दागिने (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू)- ३१.४९ (३६), सेवा- १६.५० (१४.०६). एप्रिल २०२३ मध्ये कापड, प्लॅस्टिक आणि लिनोलियम निर्यातीत घट होत राहिली. कारण प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदीच्या प्रभावामुळे मागणी कमी झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

india's imports and exports
Nashik ZP News: प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीची निविदा रद्द; वित्त आयोगाचा निधी वापरण्याचा निर्णय अंगलट

मुंबई बंदरातून सर्वोच्च वाहतूक

मुंबई बंदर प्राधिकरणाकडून २०२२-२३ मध्ये ६३.६१ दशलक्ष टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी झाली. गेल्या वर्षीच्या ५८.८९ दशलक्ष टनाच्या तुलनेत ६.२१ टक्क्यांनी अधिकची राहिली.

मुंबई बंदराने केलेला वाहतुकीच्या हाताळणीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. जवाहर द्वीपमध्ये खनिज तेलाच्या हाताळणीचा २१.८७ दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक राहिला. २०२१-११ मध्ये २०.५४ दशलक्ष टन हाताळणी झाली होती.

पोलादाच्या मालवाहतुकीत ३.९४ दशलक्ष टन हाताळणी झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्रान्सशीपमेंट कार्गो (लोह खनिज, कोळसा आदी) यांच्या हाताळणीचा १४.९५ दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

कोरोनानंतर २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे बंदरांमध्ये दाखल झालेली नव्हती. २०२२-२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा सुरू झाल्या आणि मुंबई बंदराने २० आंतरराष्ट्रीय आणि ७१ स्थानिक क्रूझ जहाजांची हाताळणी केली.

गेल्या आर्थिक वर्षात मालवाहतुकीच्या कामगिरीच्या आधारे मुंबई बंदर हे देशातील आघाडीच्या बंदरांपैकी एक म्हणून उदयाला आले. मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी व्यापार आणि इतर हितधारकांकडून बंदराला सातत्याने दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानले.

त्यांना अतिशय किफायतशीर दरांमध्ये आवश्यक ती मदत आणि विकासात्मक सुविधा पुरवण्याची ग्वाही त्यांनी दिली. या कामगिरीबद्दल श्री. जलोटा यांनी सर्व बंदर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

india's imports and exports
NDCC Bank : वैयक्तीक सभासदांसाठी 2 हजार अर्ज; जिल्हा बॅंकेच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.