"माझी पोर वाचवा..बस्स" सहा दिवसाच्या लेकीला घेऊन बाप दारोदार फिरला..अन् मग..

baby lockdown 1.jpg
baby lockdown 1.jpg
Updated on

नाशिक / मनमाड : विहिर खोदल्यावर पाणी लागावे अगदी तसाच माणुसकीच्या ओलाव्याचा अनुभव विहिरीचे खोदकाम करणाऱ्या चव्हाण दाम्पत्याला आला. कोरोनाची भीती, लॉकडाऊन, संचारबंदी अशात पोटच्या जन्मलेल्या बाळाच्या उपचाराला पैसे नाही, कुठं घेऊन जाऊ परखा मुलुख, अशातच भर उन्हात थंड हवेची झुळूक यावी तसाच एक चमत्कार त्या बापाच्या आय़ुष्यात घडला...

पत्नीचे दिवस भरले.. सरकारी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला.. मात्र...

माणुसकीचा ओलावा राहिला नाही असा जरी अनुभव काहींना आला असला तरी हा ओलावा आजही जाणवतो पोटाची खळगी भरण्यासाठी विहिरीच्या कामावर हातमजुर म्हणून विदर्भ, वर्ध्यातून नांदगाव तालुक्यात आलेल्या माणसांनी पानेवाडी, धोटाणे, पांझणदेव आदी भागात डेरा टाकला यामध्ये रवींद्र चव्हाण हा हातमजुर आपल्या गरोदर पत्नीबरोबर आला पत्नीचे दिवस भरले सरकारी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र मुलीची प्रकृती बिघडली अंगात ताप भरला, कावीळ झाली श्वास घ्यायला त्रास होऊ लागला झटके येऊ लागले चिंतेचे ढग चव्हाण दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दाटले खिशात दमडी नाही डॉक्टरांना कुठून पैसे द्यावे पोटच्या जीवाला कुठं घेऊन जाऊ डोक्यात नकोनको ते विचार येऊ लागले लॉकडाऊनमुळे कामे बंद झाली जवळ पैसे नाही खाण्यापिण्याचे वांदे अशात पोटच्या जीवाला कुठे घेऊन जाऊ अशात कुणीतरी मनमाडच्या देवकी चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं सांगताच बाप झालेल्या रवींद्रने देवकी हॉस्पिटल गाठले.

"माझी पोर वाचवा.. माझ्याजवळ पैसे नाही"

डॉ रवींद्र राजपूत यांना हकीकत सांगत "माझी पोर वाचवा माझ्याजवळ पैसे नाही" विहिर खोदल्यावर पाण्याचा ओलावा जसा जाणवतो तसा माणुसकीचा ओलावा चव्हाण दाम्पत्याला आला डॉ रवींद्र राजपूत यांनी पतीपत्नीला धीर देत तातडीने बाळ दाखल करून उपचार केले. डॉ राजपूत यांच्यासह डॉ.पूनम राजपूत, डॉ विजय राजपूत आदींनी शर्थीचे प्रयत्न करत सहा दिवस वैद्यकीय उपचार करून बाळाला मरणाच्या दारातून  सहीसलामत बाहेर काढले, बाळाचे प्राण वाचले, उपचाराची एक रुपयाही फी घेतली नाही डॉक्टरांमधील देव माणूस पाहून रवींद्र चव्हाण व त्याची पत्नी दोघांच्या डोळ्यात पाणी आले आजारातून बरे झालेल्या बाळा घेऊन जातांना पतिपत्नी डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर साहेब तुमचे थोर उपकार आमच्यावर आहे, एक रुपयाही न घेता तुमची विहिरी आम्ही खोदून देऊ कारण तुमच्या मनात ओलावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.