Nashik: द्राक्ष व्यापाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला; ओझरचे पोलिस निरीक्षक तिवारींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

Yogesh Bhandare and the unjust farmers of the taluk while honoring Durgesh Tiwari who tried to get justice by presenting a strong side regarding the fraud of farmers in Niphad taluka.
Yogesh Bhandare and the unjust farmers of the taluk while honoring Durgesh Tiwari who tried to get justice by presenting a strong side regarding the fraud of farmers in Niphad taluka.esakal
Updated on

Nashik Crime : पोलिसांनी ठरवले तर आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन देखील ते न्याय देऊ शकतात. कर्तव्य म्हणून नव्हे तर माणुसकीच्या भावनेतून निफाड तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

पोलिस निरीक्षक तिवारी यांनी भक्कम कायदेशीर बाजू मांडल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार द्राक्ष व्यापाऱ्यांचा जामीन निफाड न्यायालयाने फेटाळला. (Court rejects bail of grape traders Police Inspector Tiwari of Ozar gives relief to farmers of niphad taluka nashik crime

सुकेणा येथील शेतकरी योगेश परशराम भंडारे यांच्यासह निफाड तालुक्यातील सावरगाव, कुंभारी, पंचकेश्वर, पालखेड, वनसगाव, नांदुर्डी, कळवण तालुक्यातील अभोणा येथील ६० ते ७० शेतकऱ्यांकडून संशयित आरोपी आलम आमीन बागवान (रा. बागवान गल्ली, चांदवड),

वसीम उर्फ फिरोज युसूफ शेख (रा. उगाव, ता. निफाड), कलीम बागवान (रा. गांधीनगर, कोपरगाव), बबलू शेख (रा. उगाव, ता. निफाड) यांनी या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेत जाऊन मालाचा व्यवहार करून काही शेतकऱ्यांना रोख रक्कम व काही ‘फोन पे’वरून पैसे देत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत उर्वरित रक्कमेचा एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला.

संबंधित धनादेश शेतकरी बँकेत वटविण्यास गेले असता, खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने वटले नाही. तद्‍नंतर शेतकऱ्यांनी द्राक्ष व्यापाऱ्यांकडे पैशासाठी तगादा लावला असता, व्यापाऱ्यांनी आपला फोन बंद करून ते फरारी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Yogesh Bhandare and the unjust farmers of the taluk while honoring Durgesh Tiwari who tried to get justice by presenting a strong side regarding the fraud of farmers in Niphad taluka.
Nagpur Crime : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम

आपली फसवणूक झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत आपबिती कथन केली. यात १ कोटी ३६ लाख ७८ हजार ५८० रुपयांची फसवणूक झाली आहे.

त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या व्यापाऱ्यांविरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची सुनावणी निफाड न्यायालयासमोर झाली त्या वेळेस पोलिस निरीक्षक तिवारी यांनी पोलिसांची कायदेशीर बाजू प्रखरतेने मांडत आरोपींच्या जामीन अर्जावर हरकत घेतल्याने निफाड न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

संशयित आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, उच्च न्यायालयात देखील आम्ही शेतकऱ्यांची प्रभावी बाजू मांडणार असल्याचे दुर्गेश तिवारी यांनी सांगितले. याबाबत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तिवारी यांची भेट घेऊन आभार मानले.

Yogesh Bhandare and the unjust farmers of the taluk while honoring Durgesh Tiwari who tried to get justice by presenting a strong side regarding the fraud of farmers in Niphad taluka.
Nagpur Crime : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()