नाशिक : गडकरींच्या 'त्या' ट्विटनंतर भाजप-शिवसेनेत श्रेयवाद!

nitin gadkari
nitin gadkariesakal
Updated on

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या (muncipal corporation) पार्श्वभूमीवर नमामि गोदा प्रकल्पासाठी अठराशे कोटी रुपये देण्याची तयारी केंद्र शासनाने दाखवल्यानंतर त्यापाठोपाठ नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपुलाला केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (nitin gadakari) यांनी मंजुरी दिल्याने भाजपमध्ये (bjp) उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेने (shivsena) उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या आठवड्यात भाजप नेत्यांनी केलेल्या दिल्लीवारीत गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केल्याने उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्याचा दावा केला जात आहे.

nitin gadkari
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस नव्या चेहऱ्यांच्या शोधात!

२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. गेल्या चार, सव्वाचार वर्षांत नाशिकला फारसे काही मिळाले नसल्याने विरोधकांनी दत्तक पित्याचा मुद्दा उचलून धरला. मात्र सात ते आठ महिन्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या दृष्टीने केंद्र सरकारने विविध घोषणा करताना नाशिकच्या पदरी भरभरून दान टाकल्याने विरोधाची धार कमी झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकारने आर्थिक तरतूद करताना तातडीने प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने समृद्धी महामार्गाचेही कामकाज सुरू आहे. त्यानंतर नाशिकमधून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गालाही मंजुरी देण्यात आल्याने सुरत ते नाशिक अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे. नाशिकमधून केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने उडान योजनेंतर्गत नाशिकमधून दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू हवाई सेवा सुरू केल्याने शहराच्या विकासाला बूस्टर डोस मिळाला आहे. त्यात आता नाशिकला दोन प्रकल्प दिल्याने विकासात भर पडणार आहे. गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेत नमामि गोदा प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी केली. भाजपचे प्रतिनिधी शहरात दाखल होत नाही. तोच केंद्र शासनाने तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. केंद्रीय मंत्री शेखावत यांना भेटण्यापूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यात उड्डाणपुलासाठी निधी देण्याची तसेच रस्ते विकास प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज ट्विट करून नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपुलाचा समावेश भारतमाला प्रकल्पात केल्याने निवडणुकीसाठी भाजपला मदत होणार आहे.

द्वारका ते दत्त मंदिर चौक उड्डाणपुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार भारतमाला प्रकल्पात उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आल्याने नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

- ॲड. राहुल ढिकले, आमदार

nitin gadkari
नाशिक : द्वारका ते नाशिकरोड थेट उड्डाणपूल; नितीन गडकरींची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.