Crime: रेल्वे स्थानकावरून मुलीचे अपहरण करून रायपूरला जाणाऱ्या आरोपीला अटक

Crime
Crimeesakal
Updated on

नागपूर: इतवारी रेल्वे स्थानकावरून एका तीन वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तक्रारीवरून पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबवून अवघ्या दोन तासांत अपहरणकर्त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक केली. शामकुमार पुनितराम ध्रुव (३०) रा. मुंगेरी, बिलासपूर असे आरोपीचे नाव आहे.

राजू क्षेत्रपाल (३४) रा. वर्धमान, पश्चिम बंगाल हे शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास इतवारी स्थानकाच्या उत्तर बुकिंग कार्यालयात पश्चिम बंगालला जाण्याकरिता तिकीट आरक्षण करण्यासाठी आले होते.

Crime
Abdul Sattar: 'जवानाचा भुखंड सत्तारांनी गिळला!', फडणवीस कारवाई करणार का?

राजू हे पॅथलॅब टेक्निशियन असून इतवारीच्या दहीबाजार भागात हल्ली राहतात. तर आरोपी शामकुमार टाईल्सचे काम करतो. तो विवाहित असून त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तो टाईल्सच्या कामासाठी नागपूरला शिवनाथ एक्स्प्रेसने सकाळी आला होता.

राजू घेऊन तिकीट आरक्षित करायला आले होते. गर्दी असल्याने त्यांनी मुलीला खांद्यावरून खाली सोडले. मुलगी बाजूलाच खेळत होती. आरोपी शामकुमार तेथे आला. मुलीला मोबाईल दाखवू लागला. त्यावेळी राजू यांचे लक्ष होते.

दरम्यान तिकीट काउंटर जवळ येत असल्याने त्यांचे लक्ष तिकडे होते. तिकीट काढण्याच्या नादात त्यांचे मुलीकडे दुर्लक्ष झाले. हीच संधी साधून आरोपीने मुलीला घेऊन पळ काढला.

रेल्वे स्थानकावरून मुलीचे अपहरण

तिकीट काढून आल्यानंतर राजू यांनी मुलीला शोधले. मात्र, ती कुठेही आढळली नाही. थेट त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचे छायाचित्र संबंधित पोलिसांना व्हायरल केले.

ऑटोचालकाने नागपूर स्थानकावर सोडल्यानंतर सरफराज इतवारी स्थानकावर आला असता पोलिसांच्या चौकशीत मुलीचे अपहरण झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना आपणच आरोपीला नागपूर स्थानकावर सोडल्याची माहिती दिली.

इतवारी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंजाबराव डोळे यांनी आपल्या पथकाला नागपूर स्थानकावर पाठविले. दरम्यान आरोपी हा फलाट क्रमांक १ वर आढळला. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली.

Crime
Abdul Sattar : कृषी विभागाच्या धाडी बोगस?, दिपक गवळी कोण? सत्तारांनी स्पष्ट सांगितले

मुलीला तिच्या पालकाच्या स्वाधीन करून आरोपीवर अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला. आरोपी मुलीला रायपूरला घेऊन जाणार होता. त्याचा मुलीचा विक्रीचा विचार होता का ? याबाबत पोलिस तपास करीत आहे.

ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनानाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश नारनवरे, पोलिस हवालदार विजय सुरवाडे, धम्मपाल गवई, शबाना पठाण, दीप्ती भेंडे आदींनी केली.

ऑटो चालकाने दिली माहिती

आरोपी हा मुलीला पळवून इतवारी स्थानकाच्या बाहेर आला. तो ऑटो चालक सरफराज अली याच्या ऑटोत बसला. त्याने नागपूर रेल्वे स्थानकावर जायचे असल्याचे सांगितले. सरफराज त्याला घेऊन नागपूर स्थानकावर आला.

प्रवासात त्याने मुलीला चॉकलेट आणि बिस्कीट दिल्याने मुलगी त्याच्यासोबत खेळत होती. त्यामुळे सरफराज यांना शंका आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.