तलवारीचा छंद बाळगणे आले अंगलट; गुन्हे शाखेने केली तिघांना अटक

चुकीची आवड असेल तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो
Police arrest
Police arrestesakal
Updated on

नाशिक : प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड वा छंद असतो. चांगली आवड असेल तर त्याचे कौतुक होते, मात्र जर चुकीची आवड असेल तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागू शकतो. अशीच एक घटना समोर आली असून तिघा युवकांना जडलेला तलवारींचा छंद त्यांच्या अंगलट आला आहे.

नाशिकमध्ये तिघा तरुणांना तलवारी जमा करण्याची सवय होती. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने उज्जैन येथून आणलेल्या सात हजार रुपयांच्या सात तलवारी तिघांच्या घरातून हस्तगत केल्या आहेत.

Police arrest
शहरात दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट; वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण

विपूल अनिल मोरे (२८), चेतन रमेश गंगवाणी (२६) व गणेश राजेंद्र वाकलकर (२२, तिघे रा. शितळादेवी चौक, काझीची गढ़ी, अमरधामरोड, जुने नाशिक) अशी तिघांची नावे आहेत. युनिट एकचे अंमलदार रात्री पेट्रोलिंग करीत असताना पाेलिस नाईक विशाल देवरे यांना शितळादेवी चौक येथे राहणाऱ्या तिघांकडे धारदार तलवारी असल्याची माहिती खबर मिळाली हाेती. ही माहिती युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार अंमलदार रविंद्र बागुल, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, प्रवीण वाघमारे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, आण्णासाहेब गुंजाळ यांनी तिघांच्या घराची तपासणी करुन विपुल मोरे याच्या घरातून ४ तलवारी, चेतन गंगवाणीच्या घरातून १ तलवार व गणेश वाकलकरच्या घरातून २ तलवारी हस्तगत केल्या. याप्रकरणी तिघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिस तपास करत आहेत.

Police arrest
जळगाव : गरम चहा पडल्याने तरुण भाजला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.