Nashik Crime News : चुंचाळे शिवारातील गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी; परप्रांतीय कामगारांची वसाहत

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime News : अंबड औद्योगिक वसाहतीलगत चुंचाळे शिवारात वसलेल्या परप्रांतीय कामगारांच्या वसाहतीतील गुन्हेगारी येत्या काळात पोलिसांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

रोजगारासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेही येत असल्याने येथील गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जाते.

दाट लोकवस्तीच्या या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा असून, गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. (crime increased as immigrants includes people with criminal backgrounds in ambad chunchale shivar nashik news)

दोन दिवसांपूर्वी चुंचाळे शिवारातील संजयनगरमध्ये किरकोळ वादावादीच्या कारणातून दोन युवकांचा खून करण्यात आला. या घटनेमुळे या परिसरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा चर्चेचा विषय ठरू पाहत आहे.

मुंबई-पुण्यापाठोपाठ रोजगारासाठी परप्रांतीयांची लोंढेचे लोंढे नाशिकमध्ये येत आहेत. सातपूरचा श्रमिकनगर परिसर आणि अंबड लिंक रोडवरील दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात रहिवासाला आहेत. परप्रांतीयांनी अंबड लिंकरोडवर भंगार बाजार वसविला होता, जो महापालिकेने जमीनदोस्त केला.

भंगार बाजाराच्या आड परप्रांतीयांची गुन्हेगारी कृत्य चालायची. परप्रांतीय उत्तर प्रदेश, बिहारमधून गावठी कट्टे आणून नाशिकमध्ये विक्री करतात. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अवैध धंद्यांवर बंदी असली तरीही चुंचाळे शिवारातील परप्रांतीय वसाहतींमध्ये आजही कमी-अधिक प्रमाणात अवैध धंदे सुरूच आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime News
Crime News : लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात! कारमधील महिलेने लांबविली 13 ग्रॅमची सोनपोत

अवैध हत्यारे अन्‌ मद्यविक्री

चुंचाळे शिवारात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत. अंबड, सातपूर येथील कंपन्यांमध्ये हाताला मिळेल ते काम करणारा हा वर्ग आहे. यात तरुणवर्ग मोठा आहे. दत्तनगरपर्यंत मर्यादित असलेल्या परिसरात अनेक नगरे-चौक झाले आहेत. दाट लोकवस्तीमुळे परिसरात गुन्हेगारांचा अड्डा तयार झाला आहे. छुप्यारीतीने हत्यारांची विक्री, मद्यविक्री आणि जुगारअड्डेही चालतात. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातून मोठ्या प्रमाणात कोयते जप्त करण्यात आले होते.

पोलिसांचे ‘नेटवर्क’ कुचकामी

अंबड-सातपूर पोलिस ठाण्यांसह गोपनीय शाखेचे नेटवर्कच कुचकामी ठरल्याचे यापूर्वीही अनेकदा प्रकर्षाने समोर आलेले आहे. पूर्वीसारखे पोलिसांकडे खबऱ्यांचे नेटवर्क राहिलेले नाही. बहुतांश वेळा पोलिसांना गुन्ह्याची माहिती सोशल मीडियावरूनच मिळत असते.

गस्ती पथके नावाला गस्त घालतात. गल्लीबोळांत असलेले खबरी पोलिसांना मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे हाणामाऱ्यांच्या घटनांची माहिती मिळत नाही. परिणामी, मोठी दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू होते.

Nashik Crime News
Nashik Crime News : नाशिकरोडला पुन्हा 4 गाड्याची तोडफोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()