नाशिक : महाराष्ट्र वस्तू व सेवा करविभाग (जीएसटी) यांच्या नाशिक कार्यालयाकडून बोगस बिलासंदर्भात कारवाई केली आहे. ३७ कोटी २४ लाखांच्या बोगस बिलाप्रकरणी कारवाई करताना विभागाने एकास अटक केलेली आहे. या प्रकरणातील संशयित सुनील अमृतलाल तुलसानी यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतंर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या नाशिक कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. अस्तित्व मेटल्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट दिली होती. या व्यवसायाचे मालक सुनील अमृतलाल तुलसानी यांनी हवाला करदात्याकडून कर वजावटीचा दावा केला व प्रत्यक्षात विक्री न करता खोटी बिजके देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.
मे. अस्तित्व मेटल्स या प्रकरणामध्ये वस्तूच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय बनावट कंपन्यांकडून ३७ कोटी २४ लाख रुपयांची खोटी बिले घेऊन ६ कोटी ७० लाख रुपयांची वजावट प्राप्त केली आहे. यातून संबंधितांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी न करता बिले स्वीकारून शासनाची महसूल हानी केल्याचे उघडकीस आणले आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयित सुनील तुलसानी यांना जीएसटी विभागाच्या नाशिक कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत करचुकवेगिरी प्रकरणी शुक्रवारी (ता. ९) केलेल्या कार्यवाहीत अटक केली आहे.
हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
संशयिताला न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई नाशिक विभागाचे राज्यकर सहआयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली अन्वेषण शाखेचे राज्यकर उपायुक्त चेतन डोके यांच्या देखरेखीखाली झाली. राज्यकर सहायक आयुक्त योगेंद्र पाटील, संतोष सूर्यवंशी, डॉ. धर्मनाथ रोटे यांनी ही कारवाई केलेली आहे.
वित्तीय वर्षातील ५३ वी कारवाई
महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागाने खोट्या कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिजके देऊन कर चुकवेगिरी करण्याऱ्या करदात्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतंर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ही ५३ वी कारवाई आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.