Crime News : माथेफिरूने फेकला रेल्वे प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ; पवन एक्सप्रेसमधील प्रकाराने भीतीचे वातावरण

Indian Railway crime
Indian Railway crimeesakal
Updated on

मनमाड : लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्स्प्रेसमध्ये एका माथेफिरूने सहा प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ फेकल्याने दोन प्रवाशी जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव- मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान घडला. गाडी मनमाड स्थानकात येताच माथेफिरूला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांवरही त्याने ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेल्या खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झाले. या गदारोळात गाडी सुमारे २० मिनिटे मनमाड स्थानकात उभी होती. रेल्वे सुरक्षा बलाने माथेफिरूला ताब्यात घेतले असून, रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे.

Indian Railway crime
Measles Infection : आशादायक! मालेगावात गोवरने एकही बालमृत्यू नाही

मुंबईहुन निघालेली पवन एक्सप्रेस भुसावळकडे निघाली होती. सदर गाडी नाशिक रेल्वे स्थानकावरून निघाली असता या गाडीच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या वातानुकूलित डब्यात स्वच्छतागृहात सदर व्यक्ती गेला होता. खूप वेळ झाला असता सदर व्यक्ती बाहेर निघत नसल्याने याच डब्यात प्रवास करणाऱ्या मिलिटरी जवान श्रीशंकर द्विवेदी यांना स्वच्छतागृहात जायचे होते. सदर जवानाने अनेकदा स्वच्छतागृहाचे दार वाजवूनही हा माथेफिरू बाहेर येत नसल्याने पुन्हा दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मात्र, या माथेफिरूने दरवाजाची फट उघडी करून आतून ज्वलनशील लिक्विडचा फवारा मिलिटरी जवानाच्या अंगावर मारल्याने त्यांचे अंग भाजले गेले. घटनेची माहिती तातडीने रेल्वेच्या कंट्रोल विभागाला देण्यात आली. कंट्रोलवरून ही माहिती सुरक्षा बलाच्या जवानांना देण्यात आली. सदर गाडी मनमाड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सुरक्षा बलाच्या जवानांनी स्वच्छतागृहाचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दार उघडले गेले नाही. परंतु, दार उघडल्यावर या माथेफिरूने उपस्थित असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांवर देखील ज्वलनशील लिक्विड फेकले. तर हेच लिक्विड मदतीसाठी धावलेल्या इतर वेंडरवर जाऊन पडले.

Indian Railway crime
Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा गळा आवळून खून

ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेले खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झाले. या गदारोळात गाडी सुमारे २० मिनिटे मनमाड स्थानकात उभी होती. रेल्वे सुरक्षा बलाने माथेफिरूला ताब्यात घेतले असून, रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.