Nashik Crime : जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी सिडको मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे, सुरेंद्र खाडे आणि एका तोतया पोलिसासह अन्य काही जणांवर अंबड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी पुढील तपास सहायक पोलिस उपायुक्त शेखर देशमुख हे तपास करीत आहे. (Crime under Atrocities against CIDCO municipal officials nashik news)
४ ऑक्टोबर २०२३ रोजी मयूर पाटील, गोकुळ पगारे, जागा मालक म्हणून हक्क सांगणारे संशयित सुरेंद्र खाडे व तोतया पोलिस हे कामटवाडे शिवारात असलेल्या वृंदावन नगरात राहत असलेल्या श्रीमती. अंभोरे यांच्या घरी येत ते राहत असलेले पत्र्याचे शेड तोडून त्यांच्या घरातील संसारपयोगी वस्तुंचे नुकसान करीत काही वस्तु देखील सोबत घेऊन गेले.
यावेळी जाताना या सर्वांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली.
यानंतर श्रीमती. वंदनाबाई अंभोरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात विभागीय मनपा अधिकारी, संशयित सुरेंद्र खाडे, आणि इतरांविरुद्ध ॲट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपायुक्त शेखर देशमुख करीत आहेत.
याप्रकरणी विभागीय अधिकारी मयुर पाटील यांनी सदरची तक्रार ही खोटी असल्याचा दावा केला आहे. परंतु अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.