येवला (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसविल्याने राजापूर (ता. येवला) येथील युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या युवकांवरील सर्व सदरचे गुन्हे मागे घेतले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार नरेंद्र दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. (Crimes against youths of Rajapur will withdrawn Fadnavis assures MLA Darade Nashik News)
नोव्हेंबर २०२० मध्ये राजापूर येथील चौफुलीवर काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाची स्थापना केली होती. मात्र परवानगी न घेतल्याने त्याचवेळी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात येवला दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. या समारंभात ज्येष्ठ माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ही मागणी केली होती.
मात्र, अनेक दिवस होवूनही गुन्हे मागे न झाल्याने आमदार नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधत या युवकांनी सामाजिक भावनेतून व आदरापोटी सदरचा पुतळा बसविला होता. त्यामुळे त्यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.
यावर प्रश्नावर उत्तर देताना श्री. फडणवीस म्हणाले की, कुठेही महापुरुषांचे पुतळे परवानगी घेऊन लावावे लागतात. अनेकदा काही अनुचित प्रकार होण्याची भीती असते. तसे घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होतो किंबहुना अनेकदा तणावाच्या परिस्थितीत पुतळ्यांना संरक्षण देखील देण्याची वेळ येते.
परवानगी न घेता पुतळा लावल्यास पुतळा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. याच नियमाने राजापुरच्या घटनेत गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र या युवकांचे वातावरण बिघडविण्याचा कुठलाही हेतू नव्हता. त्यामुळे सौंदर्याच्या भावनेतून हे गुन्हे मागे घेतले जातील.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
यासंदर्भात नियमानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार असून त्यांना याबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात येतील अशी घोषणा श्री. फडणवीस यांनी केली. दरम्यान याच प्रश्नावर बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, परवानगीच्या पद्धतीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कुठल्याही महामानव यांचा पुतळा बसविण्याची परवानगीची पद्धत अतिशय क्लिष्ट आहे.
किंबहुना अधिकारी परवानगीच देत नाही. आम्हालाडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परवानगीला तब्बल तीन वर्ष पाठपुरावा करावा. त्यामुळे परवानगी तातडीने देण्यात यावी तसेच परवानगीची पद्धत सुलभ करावी अशी मागणी त्यांनी केली. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.