Nashik Crime : एसटी बस मधून डिझेलची चोरी करणारा पठ्ठ्या अटकेत! चोरीच्या इंधनासह डिझायर कार जप्त

गेल्या सप्टेंबर महिन्यात बेलू ता. सिन्नर येथे मुक्कामी असलेल्या इगतपुरी आगाराच्या बसमधून डिझेलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
criminal stole diesel from ST bus arrested Dzire car seized with stolen fuel Nashik Crime
criminal stole diesel from ST bus arrested Dzire car seized with stolen fuel Nashik Crimeesakal
Updated on

सिन्नर : गेल्या सप्टेंबर महिन्यात बेलू ता सिन्नर येथे मुक्कामी असलेल्या इगतपुरी आगाराच्या बसमधून डिझेलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

या चोरट्याकडून चोरीचे इंधन व चोरीसाठी वापरण्यात येणारी स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त करण्यात आली आहे. (criminal stole diesel from ST bus arrested Dzire car seized with stolen fuel Nashik Crime)

दिनांक 22 सप्टेंबर च्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास इगतपुरी आगाराच्या बेलू येथे मुक्कामी असलेल्या एसटी बस  क्र MH14 / BT3272 च्या  डीझेल टाकीचे लॅाक तोडुन १० हजार ६४५ रुपयांचे सुमारे १२० लिटर डिझेल चोरून नेण्यात आले होते.

सिन्नर पोलीस ठाण्यात बस चालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अपर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी या गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी पथक नियुक्त केले होते.

गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिकी विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता अमोल अविनाश कुंदे राहणार एकरुखे तालुका राहता या सराईत गुन्हेगाराचे नाव समोर आले होते.

अमोल याचा छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यात इंधन चोरीच्या अनेक घटनांमध्ये सहभाग असल्याने तेथील पोलीस देखील त्याचा शोध घेत होते.

criminal stole diesel from ST bus arrested Dzire car seized with stolen fuel Nashik Crime
Latur Crime News : लातूर येथील विवेकानंद चौक पोलिसांची हैदराबाद येथे कारवाई ; खूनप्रकरणी एकजण ताब्यात

पोलीस निरीक्षक श्री पाटील यांना अमोल हा त्याच्या कारमधून सिन्नर शिर्डी महामार्गावरून शिर्डी कडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी

पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक दिपक अहिरे, शांताराम नाठे, हवालदार सचिन धारणकर, पोलिस नाईक विनोद टिळे, गिरीष बागुल यांच्या पथकाने सिन्नर बायपास व गोरेवाडी फाटा, मुसळगाव औद्योगिक वसाहत या ठिकाणी सापळा रचला.

गुरेवाडी फाटा येथे संशयित अमोल कुंदे हा डिझायर कार मधून शिर्डी कडे जात असल्याचे दिसताच साध्या वेशातील पोलीस पथकाने त्याला थांबवले. यावेळी त्याच्या कार मध्ये प्लास्टिक ड्रम मध्ये डिझेलचा साठा आढळून आला.

त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने इंधन चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे सांगत बेलु शिवारातून रात्रीच्या वेळी बसमधून डिझेल चोरल्याची कबुली दिली.

आपल्या स्विफ्ट डिझायर कार मधून येऊन रात्रीच्या वेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या वाहनांमधून इंधन चोरी करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या कार मधून 50 लिटर चोरीचे इंधन जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेने  संशयित आरोपी व मुद्देमाल सिन्नर पोलिसांच्या ताब्यात दिला.

criminal stole diesel from ST bus arrested Dzire car seized with stolen fuel Nashik Crime
Solapur Crime : पैसे न आणल्याने पत्नीला सोडून पलायन; प्रेयसीसोबत राहात असल्याचा पाठवला मेसेज; गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.