नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या दहीपूल परिसरात रविवारी (ता. १५) रात्री वर्चस्ववादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांनी भद्रकाली पोलिसांनी दहीपूल, मेनरोड परिसरातून धिंड काढली.
यावेळी पोलिसांनी ‘स्पॉट’ पंचनामा करीत संशयितांना घटनास्थळ नेत खातरजमा केली. दरम्यान, याप्रकरणी आत्तापर्यंत दोन्ही गटातील १४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. (criminals parade by police in Dahipool area Panic among merchants by gangs for supremacy Nashik News)
दहीपूल परिसरातील एका महिला विक्रेत्याशी टोळक्याने हुज्जत घातली. काही दिवसांपासून टवाळखोर पैसे मागत असल्याचा दावा महिलेने केला आहे. या वादातून दोन गटात दंगल उसळली. यावेळी संशयितांनी दुकानांच्या काचा फोडून वाहनांची मोडतोडही केली होती.
दरम्यान, मंगळवारी (ता. १७) सकाळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या पथकाने संशयितांना घटनास्थळी नेत स्पॉट पंचनामा करीत त्यांची व्यापारी पेठेतून धिंडच काढली.
तिथे हत्यारांचा वापर, दमदाटी, हाणामाऱ्या, तोडफोड केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. यावेळी भद्रकाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यावेळी परिसरातील दुकानदार व नागरिकांची गर्दी झाली होती. बऱ्याच महिन्यांपासून गुंडागर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याने बाजारपेठेतही समाधान व्यक्त होत होते.
अटकेतील संशयित
हृषीकेश किरण खैरे (२६, रा. आसराची वेस), सुशील ऊर्फ हेमराज ऊर्फ यमराज मनोहर गायकवाड (२८, रा. मधुबन कॉलनी), नरेश हिरालाल राठोड (२९, रा. खुटवडनगर), लवकुश दयाल यादव (२६, रा. अशोकस्तंभ), चेतन पांडुरंग खैरनार (२५, रा. काझीगढी), बाळा बाबूलाल प्रसाद (२५, रा. भद्रकाली),
गौरव ऊर्फ गणेश राजेंद्र खैरे (२४, रा. आसराची वेस), ओम सतीश खैरे (१९, रा. पाटील गल्ली), शुभम संतोष दाते (१९, रा. हिरावाडी), प्रवीण नरेश बोराडे (१९, रा. चित्रघंटा), ओमकार कुंदन जगताप (२०, रा. पाटील गल्ली), शुभम जगन्नाथ जायभावे (१९, रा. पाटील गल्ली), राकेश अनिल जगताप (२७, रा. आसराची वेस), लक्ष्मण काशिनाथ साबळे (२७, रा. कुंभारवाडा).
"दहीपूलावरील हाणामारीची घटना ही वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. याप्रकरणात पोलिस स्वत: फिर्यादी असून, दोन्ही गटातील चौदा संशयितांना अटक केली आहे. व्यापारी, फेरीवाल्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सदरील घटना घडल्याचे दिसून येते. याबाबत सखोल तपास सुरू आहे."
- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.