Crop Crisis : वांगी पिकावर फिरवला रोटर; बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हताश

Dhananjay Borse turning the rotor on the brinjal crop in his field.
Dhananjay Borse turning the rotor on the brinjal crop in his field.esakal
Updated on

खामखेडा (जि. नाशिक) : शेतीच्या प्रत्येक हंगामात संकटांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे.

कांदा, मेथी, कोबी, वांगी या पिकांसोबत भाजीपाला पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही शेतीमालातून निघणे कठीण झाल्याने सावकी (ता. देवळा) येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावरील वांगी पिकावर बुधवारी (ता.८) रोटर फिरवला आहे. (Crop Crisis farmer Rotor brinjal crop Farmers desperate as they not getting market price nashik news)

श्री. बोरसे यांनी अर्धा एकर क्षेत्रावर तीन महिन्यापूर्वी वांगीची लागवड केली होती. महिन्याभरापासून उत्पादन सुरु झाले होते. मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीही येत नसल्याने शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते मातीतच घातलेले बरे म्हणून वांगी पिकावर रोटर फिरवला.

काही दिवसांपासून कांदा, वांगे, आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतात आलेल्या पिकावर कधी ट्रॅक्टर फिरवतात, कधी उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Dhananjay Borse turning the rotor on the brinjal crop in his field.
Rajwadi Holi Kathi : ब्रॅन्डिंगसह पर्यटनदृष्ट्या दर्जेदार सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. गावित

वांगी पिकासाठी वापरण्यात आलेली खते, औषध फवारणीचा साधा खर्चही या पिकातून निघणार नसल्यामुळेच धनंजय बोरसे यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याच्या पिकावरही ट्रॅक्टर फिरवून कांदा मातीत घातला होता.

"पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च करून भाजीपाला पीक घेतले होते. मात्र वांगीला एक रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे बोरसे यांनी पिकावर रोटर फिरण्याचा निर्णय घेतला."

- धनंजय बोरसे, सावकी

Dhananjay Borse turning the rotor on the brinjal crop in his field.
Nashik News : नागरी सुविधांची वानवा अन् पुरस्कारांचा गोडवा! पुरस्कारप्राप्त शिरसाठे गावाची दैना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.