Crop Insurance : शेतकऱ्यांना हेक्टरी 6 ते 10 हजारांपर्यंत मदत; 25 टक्के मदतीचे आकडे निश्चित

 Loan
Loanesakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Crop Insurance : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के मदतीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रत्यक्ष मदतीचा आकडाही निश्चित झाला आहे. शेतकऱ्यांना पीकनिहाय हेक्टरी सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत मदत मिळण्याची शक्यता कृषी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे.

जून व जुलै मधील रिमझिम पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात खरिपाची ९२ टक्के पेरणी झाली. कधीतरी पाऊस पडेल, या अपेक्षावर शेतकरी जगत असताना ऑगस्ट जवळपास कोरडा गेल्याने त्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षांवरही पाणी फिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा लागली आहे. (crop insurance 6 to 10 thousand help to farmers crop wise nashik news)

जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविल्याने त्याआधारे २५ टक्के रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ओरिएन्टल पीकविमा कंपनीला दिले. पीकविमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे नुकसानीची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्या माहितीच्या आधारे शासनाने २६ जून २०२३ ला खरीप हंगामातील १५ पिकांच्या नुकसानीच्या ७० टक्के मदत करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

त्यासाठी प्रत्येक पिकाचे मूल्य निश्चित करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचे सूत्रही ठरवून दिले आहे. कुठलीही पीकविमा कंपनी या सूत्राच्या आधारे शेतकऱ्यांना मदत करते. त्याआधारे तालुक्यातील नुकसानीचा जास्तीत जास्त आकडा गृहित धरून मदतीची हा आकडा समोर आला आहे. आपल्याला नक्की किती मदत मिळू शकते, याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांना बांधता येणार आहे.

खर्च लाखोंचा, मदत हजारांत

खरीप हंगामात प्रत्येक शेतकरी पेरणी करत असल्याने लाखो रुपयांचे बियाणे व रासायनिक खतांची विक्री झाली. एक रुपयात पीकविमा असल्याने ९९ टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला. ही मदत हजारांत मिळणार असली तरी, आता मदत मिळण्याचा हाच एकमेव मार्ग शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Loan
Nashik Crop Loan: 25 हजार शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच! कृषी विभागाचे शर्थीचे प्रयत्न

पीकनिहाय मिळणारी २५ टक्के मदत (हेक्टरी)

तालुका .... सोयाबीन ... बाजरी ... मका ... भुईमूग ... कपाशी ... मूग

निफाड ..... ७३५० .... ००० ..... ४९३५ ..... ००० ...... ००० .... ०००

नाशिक .... ७५४८ .... ००० ...... ००० ...... ००० ....... ००० ... ३६७२

चांदवड .... १०६३३ ... ६११७ .... ८०८१ .... ८४३१ ..... ००० ... ४४३८

सिन्नर .... ९६९७ .... ६४४५ ..... ७६६० .... ८३८४ .... ००० .... ०००

दिंडोरी ..... ८२३५ ... ००० ....... ००० ...... ००० .... ००० ....... ०००

मालेगाव ... ०० ...... ६२३४ ...... ६४५३ ... ६१२३ ... ७४७९ .... ०००

देवळा .... ०० ....... ६८०४ ...... ५९७० ... ९३१० .... ००० ...... ३८६०

बागलाण ... ०० ..... ६४३६ ..... ६०३६ ... ७९३९ ... ००० ....... ०००

नांदगाव ... ०० .... ७२९८ ...... ८४८८ ... १०७०१ ... १२२२५ ... ४९५९

येवला .... ०० ..... ३९७८ ....... ४८३१ ... ६१७१ .... ७७२३ ..... ३१७६

 Loan
Farmer Crop Loan : ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.