Crop Insurance Protection: सोयाबीन, कपाशीला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

crop insurance scheme latest marathi news
crop insurance scheme latest marathi newssakal
Updated on

Crop Insurance Protection : खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना २०२३ मध्ये लागू केली आहे.

त्या अंतर्गत सोयाबीन व कपाशी या पिकांना ५० हजार रुपयांचे पीकविमा संरक्षण मिळेल. (Crop insurance protection of 50 thousand for soybeans cotton Nashik)

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.

जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती केली आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्ये व कडधान्ये, तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कपाशी, खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.

पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग आदी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरीप हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्याने होणाऱ्या नुकसानीचा पीकविम्यात समावेश आहे.

त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crop insurance scheme latest marathi news
Nashik News: ‘सिव्हिल’च्या अंगणातच ‘आरोग्या’ची वाताहत! उघड्या गटारी, ढापे अन्‌ जागोजागी डबकी, चिखल

"पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना ऐच्छिक असली, तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा."

- विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी, नाशिक

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रतिहेक्टर)

मका : ३५ हजार ५९८ रुपये,

कपाशी : ५० हजार रुपये,

सोयाबीन : ५० हजार रुपये,

बाजरी : २७ हजार ५०० रुपये,

तूर : ३६ हजार ८०० रुपये,

मूग : २२ हजार ५०० रुपये

crop insurance scheme latest marathi news
SAKAL Special: व्हिडिओ एडिटिंगचा सुधारला दर्जा! नाशिकमध्ये हीट गाणी, लघुपटांचे होतेय संकलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.