Crop Insurance Scheme : एक रुपयात पीकविम्याचा सर्व्हर डाउन; शेवटचे 8 दिवस शिल्लक

server down of Registration and Stamp Duty Metro tax pune
server down of Registration and Stamp Duty Metro tax pune sakal
Updated on

Crop Insurance Scheme : शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असताना तीन दिवसांपासून फॉर्म भरण्याचा सर्व्हर डाउन झाल्याने नोंदणी रखडली आहे. जिल्ह्यातील एक लाख ९० हजारांवर शेतकऱ्यांनी या योजनेत यंदा सहभाग घेतल्याचे चित्र आहे.

एक रुपयात पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्‍यांनी भाग घ्यावा म्हणून कृषी विभाग प्रयत्नशील आहे. (Crop Insurance Scheme server down for three days nashik news)

पीकविमा नोंदणी ऑनलाइन असल्याने शेतकऱ्‍यांना त्यासाठी थोड्याफार प्रमाणात पैसे मोजावे लागतात. नोंदणी करताना कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागतो. यामुळे खासगी ऑनलाइनकडे बोट दाखवले जाते.

एवढे करूनही शेतकरी आता सीएससी केंद्र किंवा खासगी केंद्रावर अर्ज भरण्यासाठी तयार झाल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडसर निर्माण झाला आहे. संबंधित शेतकऱ्याचे आधारकार्ड ‘व्हेरीफाय’ होत नाही, तर कधी सातबाऱ्याची वेबसाइट बंद असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

server down of Registration and Stamp Duty Metro tax pune
Nashik ZP News : प्रलंबित 123 पेन्शन प्रकरणांचा आज निपटारा; जि. प. सामान्य प्रशासन विभागाची विशेष मोहीम

भूमिअभिलेखाच्या वेबसाइटवर अचानकपणे जास्त भार आल्यामुळे ही वेबसाइट बंद पडत असल्याचे सायबरतज्ज्ञांनी म्हटले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेबसाइट जेव्हा आधार किंवा सातबाऱ्यासोबत पडताळणी करण्याची वेळ येते तेव्हाच वेबसाइट बंद पडते.

दिवसभरात साधारणतः पाच ते दहा मिनिटे ही वेबसाइट सुरू राहात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांची इच्छा असतानादेखील या योजनेत त्यांना सहभाग घेता येत नसल्याने त्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

"एक रुपयात पीकविमा योजना ही अत्यंत चांगली आहे. त्यासाठी अर्ज करण्यास तांत्रिक अडचण येत असल्याने या योजनेस अर्ज स्वीकृतीसाठी मुदतवाढ द्यावी." - समाधान देवकर, शेतकरी

server down of Registration and Stamp Duty Metro tax pune
YCMOU News : मुक्‍त विद्यापीठात शिक्षण अवघ्या 'इतक्या' रुपयांत! विद्यार्थ्यांना शुल्‍कात सवलतीची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.