नाशिक : त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमी (PTC) समोरील एक हजार कोटींहून अधिक किंमत असलेल्या मोक्याच्या ठिकाणच्या वादग्रस्त जागेवरचा मालकी हक्क उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर त्या जागेवर महापालिकेने हक्क दाखविण्यासाठी न्यायालयात धाव घेणे अपेक्षित होते.
परंतु महापालिकेने जागा नावे करण्यासाठी कुठली कार्यवाही केली तर नाहीच मात्र आता संबंधित जागेवर बांधकाम मंजुरीसाठी गुपचूप फाइल जमा करण्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेने वेळीस लक्ष न दिल्यास करोडो रुपयांची मालमत्ता हातून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (crores property in front of PTC ground nmc nashik Latest marathi news)
नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ मध्ये अनुक्रमे ५१/१५, ६०/१५, ६१/१५, ६२/१५, ६३/१५ व ६५/१५ भूसंपादनाचे प्रस्ताव क्रमांकाचे सहा आरक्षणे असलेली २४ हेक्टर ६२ आर जागा आहे.
सदर जागेचे मुळ मालक असल्याचा दावा करताना मंजूर विकास आराखड्यातील आरक्षित जागेचा मोबदला मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जागा मालकांना हक्क सिद्ध करण्यासाठी आदेशित केले.
परंतु पुरावे सादर न करता आल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये न्यायालयाने जागा मालकीचा त्यांचा दावा फेटाळला. जागा मालकी संदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. दावा फेटाळल्यानंतर शपथपत्रानुसार जागेवर नाव लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते.
मात्र, निकाल लागल्यानंतर अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयानेदेखील महापालिकेला जागा मिळावी म्हणून ठोस पावले उचलली नाही.
जागेवर बांधकाम
मालकी हक्क सिद्ध करता न आल्याने उच्च न्यायालयाने जागेवरचा दावा फेटाळला. महापालिकेने शपथपत्रानुसार जागा नावावर करण्यासाठी कुठलाच पत्रव्यवहार केला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला जमीन मिळवून देणे गरजेचे होते.
मात्र, शासनाकडून मार्गदर्शन मागविले. गेल्या अडीच वर्षांपासून प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले, मात्र आता सदर जागेवर बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यासाठी महापालिकेत फाइल फिरवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.