Bhavanimata Yatrotsav : बारागाड्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी

crowd of citizens for seeing Chariot pulling program of Bhavani Mata Yatrotsav nashik news
crowd of citizens for seeing Chariot pulling program of Bhavani Mata Yatrotsav nashik newsesakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : प्राचीन परंपरा लाभलेल्या भवानीमाता यात्रोत्सवाचा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, माजी सभापती प्रकाश लोंढे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी झाला. (crowd of citizens for seeing Chariot pulling program of Bhavani Mata Yatrotsav nashik news)

दरम्यान या वर्षी बारागाड्या ओढण्याचा मान संदीप मारोती निगळ यांना मिळाला. साडीचोळी, पितांबर, फेटा, चाळ असा पेहराव करून अर्धनारी नटेश्वर रूपात सायंकाळी या श्रीगणेशाची गावातून मंगलवाद्यांच्या सुरात मिरवणूक काढण्यात आली.

पंचक्रोशीतील देवी- देवतेचे दर्शन घेत औद्योगिक वसाहतीमधील भवानी मातेची दर्शन करून गणेशा इएसआय रुग्णालय ते सातपूर विभागीय कार्यालयाजवळील मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यासाठी दाखल झाले. पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खंडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

crowd of citizens for seeing Chariot pulling program of Bhavani Mata Yatrotsav nashik news
Gudhi Padwa Festival : ‘ऑटोमोबाईल’ मध्ये 30 कोटींची उलाढाल! गुढीपाडव्‍याचा साधला मुहूर्त

गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण होत. या वेळीही बारागाड्यावर भाविकांना बसू दिले नाही. या वेळी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महेश हिरे, सातपूर विभागीय अधिकारी मयूर पाटील, माधुरी बोलकर, स्वप्नील पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.

या वेळी यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष तुकाराम बंदावणे, शिवाजी मटाले, तुषार भदुरे, मंगेश निगळ, माजी अध्यक्ष लक्ष्मण घटोळ, त्र्यंबक भंदुरे, कार्याध्यक्ष सागर निगळ, गोकूळ निगळ, शांताराम निगळ, राजाराम निगळ, प्रकाश निगळ, भिवानंद काळे, अमर काळे, दीपक निर्वाण यांनी स्वागत केले.

crowd of citizens for seeing Chariot pulling program of Bhavani Mata Yatrotsav nashik news
Gudhi Padwa Festival : आनंदाची गुढी...! स्वागत यात्रेने नववर्षाचे स्वागत! शोभायात्रेने सांगता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.