2000 Rupee Note Exhange: नोटा बदलण्यासाठी नागरिकांची भाऊगर्दी! अडीचशे कोटींचा भरणा

2000 Notes
2000 Notesesakal
Updated on

Note Exhange : ऑक्टोबर महिन्यापासून बंदी येत असलेल्या दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी आज बँकांसह विविध ठिकाणी गर्दी झाली. नोट घेण्यास नकार मिळत नसल्याने ग्राहकांना फारशी अडचण आली नाही.

मात्र रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याने २०१६ च्या नोटबंदीची आठवण मात्र ग्राहकांना झाली. शहरात दोन हजार रुपयांच्या नोटांच्या भरण्यातून जवळपास अडीचशे कोटींचा भरणा झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. (crowd of citizens to exchange 2000 rupee notes Payment of two hundred fifty crores nashik news)

रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ ही नोटा बदलण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. नोट बदलत असताना बँकांना देखील ते घेणे बंधनकारक आहे तर, २००० च्या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत चलनातून बाद होणार नसल्याने त्याचा व्यवहार देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने दोन हजार रुपयांची किरकोळ साठवण असलेल्या छोट्या ग्राहकांनी आज थेट बँका गाठल्या. ज्या बँकांकडे एटीएम च्या माध्यमातून भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तेथे बँकांच्या एटीएम समोर रांगा लागलेल्या दिसल्या.

मात्र नोटा सीडीएम माध्यमातून स्वीकारल्या जात असल्याने नागरिकांकडून रांगेत उभे राहिल्याचा संताप गिळंकृत करण्यात आला. बँकांनी मात्र गर्दी करू नये नोटा बदलून मिळतील किंवा भरणा करण्यास अडचण नसल्याचे जाहीर केले आहे.

चलनात आणण्याचा प्रयत्न

दोन हजार रुपयांच्या नोटा जसे बँका व आर्थिक संस्थांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जात होते. त्याचप्रमाणे किरकोळ खरेदी देखील दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये होत असल्याचे दिसून आले.

विशेष करून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटेचा वापर करण्यात आला. नोट स्वीकारली देखील मात्र पंपचालकांकडून दीड ते दोन हजार रुपयांचे इंधन भरण्याची सक्ती करण्यात आली.

त्याचबरोबर किराणा, शॉपिंग मॉल आदी ठिकाणी देखील दोन हजार रुपयाची नोट चलनात आणली गेली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

2000 Notes
2000 Rupees Note: ‘ती दिसलीच नाही; तर बदलण्यासाठी आणायची कोठून’? दोन हजाराच्या नोटबंदीवर मिम्सचा भडिमार

जमिनीचे व्यवहार दोन हजारात

दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याने अनेक मोठ्या ग्राहकांकडून जमिनीचे व सदनिका खरेदीचे व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. व्यवहार करताना दोन हजार रुपयांच्या नोटेची देखील अट टाकली जात आहे.

छोट्या विक्रेत्यांकडे खपविण्याचा प्रयत्न

भाजी बाजारासह किरकोळ खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडे दोन हजार रुपयांची नोट खपविण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. परंतु पुढे बॅंकेकडून नोट घेतली जाईल की नाही, घेतली तर रांगेत उभे राहावे लागेल या शंकेने छोट्या विक्रेत्यांमध्ये दोन हजारांच्या नोटांचे व्यवहार झाले नाही.

रिक्षा चालक तसेच, बस सेवेमध्ये देखील सुट्टे नसल्याचे कारण देत दोन हजार रुपयांची नोट नाकारण्यात आली.

2000 Notes
Summer Business : उन्हाच्या चटक्याने लोखंडी कुलर वाढली मागणी; दरात 20 टक्के वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.