Nashik: देवळा बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड! लग्नसराई, सुट्ट्यांमुळे बसेसला गर्दी, फेऱ्या वाढविण्याची मागणी

Crowd of passengers to board the bus going to Nashik at the bus stand
Crowd of passengers to board the bus going to Nashik at the bus standesakal
Updated on

Nashik : सध्या मे महिन्यात लग्नसराईची धामधूम जोरात सुरू असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी एसटी बसला पसंती दिली आहे. त्यातच बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची एकच झुंबड उडत असल्याचे चित्र आहे.

मे महिन्यात शाळांच्या सुट्ट्यांबरोबरच लग्नसराई आल्याने प्रवासी संख्या वाढली आहे. तप्त उन्हाळा त्यातच दुपारनंतर सुरू होणारा पावसाळा यामुळे प्रवाशांनी सुरक्षित साधन म्हणून एस. टी.बसचा पर्याय स्वीकारला आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने महिलांना तिकीट दरात सवलत दिल्यामुळे बसस्थानकावर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. (Crowd of passengers at Devla bus station Crowded buses due to weddings holidays demand to increase trips Nashik news)

बाहेरून येणाऱ्या गाड्या फुल्ल

देवळा बसस्थानकात नाशिककडे जाणाऱ्या सर्वच गाड्या ओव्हरलोड धावत आहेत. साक्री, नवापूर, नंदुरबार, सटाणा येथून येणाऱ्या बसगाड्या आधीच पूर्ण भरलेल्या येत असल्याने देवळा येथून बसणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये जागाच मिळत नाही.

त्यामुळे प्रवासी दोन ते तीन तास ताटकळत उभे राहतात. कडक उन्हाचा तडाखा सहन करत आबालवृद्ध, लहान मुले,स्त्रिया यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. एसटी प्रशासनाने लग्नसराईच्या दिवसांमध्ये देवळा येथून नाशिक जाण्यासाठी जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी आहे.

बस स्थानकात प्रवाशांची अडचण

देवळा बसस्थानकाचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी अथवा बसण्यासाठी निवाऱ्याची सोय नाही. पूर्वीच्या मानाने बस स्थानकात जास्त गाड्या उभ्या राहू शकत नाहीत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crowd of passengers to board the bus going to Nashik at the bus stand
SAKAL Exclusive : अवकाळी पावसाने लग्नसोहळ्याचे वाजले की बारा! शेतमळ्यातील सोहळ्यांना सर्वाधिक फटका

एकावेळी फक्त तीन ते चार गाड्या बस स्थानकात उभ्या राहू शकतात. त्यामुळे नूतनीकरणाच्या नादात बस स्टॅन्ड म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

खासगी वाहनांमुळे बसेसला अडथळा

आधीच बसस्थानकात गाड्या उभ्या राहण्यासाठी अतिशय तोकडी जागा उपलब्ध आहे. त्यातच दुचाकी व खासगी वाहनधारक स्थानकात वाटेल तेथे आपली वाहने उभी करतात त्यामुळे बसचालकाला गाडी आत आणताना व स्थानकातून बाहेर जाताना कसरत करावी लागते.

काहीवेळा तर रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागते. त्यामुळे विनाकारण वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानकात उभ्या राहणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Crowd of passengers to board the bus going to Nashik at the bus stand
Nashik News : महापालिकेच्या स्वच्छतेवर नागरिकांचा संताप; सुविधांची वाणवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.